Categories: Featured

गगनबावड्याची ‘वैदेही पाध्ये’ ठरली ‘नवा पर्व, युवा सर्व’ स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाची मानकरी

कोल्हापूर। ‘नवा पर्व, युवा सर्व’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन व्हायरल चित्रकला व वक्तृत्व स्पर्धे’त कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातल्या कु. वैदेही श्रीकृष्ण पाध्ये हिने (भाषण) प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. वैदेही पाध्ये हिने भाषणासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा’ हा विषय निवडला होता. या ऑनलाईन स्पर्धेत महाराष्ट्रभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. यासर्वांवर मात करत वैदेहीने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

भाषण आणि चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रभरातून तब्बल ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यातून लाईक, कमेंट, व्हिज आणि शेअर याच्या आधारे गुणांकन देऊन विजेते घोषित करण्यात आले. भाषण स्पर्धेत वैदेही पाध्ये हिने आपल्या भाषणाला १०६२ लाईक, ७५५ कमेंट, ५६२ शेअर, आणि १३,७०० व्हिजच्या आधारे एकूण ३७४९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक शबाना मोमिन, तिसरा क्रमांक अजय अंधारे, चौथा क्रमांक संभाजी पाटील आणि पाचवा क्रमांक माधवी देशमुख यांना मिळाला. 

“मला ह्या स्पर्धेबद्दल अगदी शेवटचे काही तास शिल्लक असताना समजलं… त्या आधी आठवडाभर ही स्पर्धा चालू होती… त्यामुळे भाषणाची तयारी नसल्याने भाग घ्यायचा की नाही ह्या विचारात होते… तरीही शेवटच्या क्षणी जरी भाग घेतला तरी नंबर मिळवायचाच या उद्देशाने स्पर्धेत सहभागी झाले. भाषणाची तयारी नसतानाही मी माझा विषय मांडला… महाराजांचे आशीर्वाद सोबत होतेच… त्यामुळं ही स्पर्धा मी बाकी कोणाशी न करता स्वतः समोर एक नवीन आवाहन आहे असं समजून स्विकारले आणि आज… Result आपण पाहत आहातच.. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि तुम्ही दिलेली साथ मला या यशापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद!” – वैदेही पाध्ये

चित्रकला स्पर्धेत साक्षी भातलवंडे, राजेश सरोदे, स्नेहा गोरे, श्रेयस सावरकर, मुक्तार शेख, सलीम अत्तार, शैलेश चौधरी, ज्योती काकडे, आणि रोहित शिंदे या सर्वोत्कृष्ट १० जणांची निवड करण्यात आली. त्यातून रोहित शिंदे यांने प्रथम क्रमांक मिळवला. तर दुसरा क्रमांक ज्योती काकडे, व तिसरा क्रमांक शैलेश चौधरी यांना मिळाला. हे सर्व निकाल लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून आयोजक प्रा. तुषार वाघमारे यांनी घोषित केले. 

सध्या भारत तसेच संपूर्ण देश एका अनपेक्षित अशा रोगाशी लढत असून सर्वांवर लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने घरी असताना सर्वांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

भाषण स्पर्धेतील सहभागी स्पर्धक

मेघऱाज शेवाळे, ओंकार भिसे, प्रतिक निरंकर, कुणाल पाटील, प्रतिज्ञा कांबळे, हरिदास आकारे, प्रणिता चौगुले, सुप्रिया बिडवे, सुखानंद सुतार, अजय खांडे, श्वेता माने, सिद्रराम सोळंकी, अशिष पवार, पुजा परडे, ऐश्वर्या कोष्टी, राजरत्न कुंटे, प्रदिप अडसूळ, प्रफुल्ल अस्तवले, मोनिका गिडवाणी, माधवी देशमुख, संभाजी पाटील, अजय अंधारे, शबाना मोमिन, वैदेही पाध्ये. 

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: online viral compitition नवा पर्व प्रा. तुषार वाघमारे युवा सर्व वैदेही पाध्ये