Categories: राजकीय

फडणवीस… हिम्मत असेल तर ‘हे’ करून दाखवा – शरद पवार

मुंबई। हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असे आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिआव्हान दिलयं. ‘फक्त राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या. आमची काहीच हरकत नाही.’ आणि हे करून दाखवाच, असे चॅलेंज शरद पवार यांनी फडणवीस यांनाच दिलयं. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथे बोलताना ‘हिम्मत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असे भाजपला आव्हान दिले होते. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिम्मत असेल तर पुन्हा जनतेच्या कोर्टात जाऊ. पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यांच्यामध्ये समन्वय नाही असे म्हणणाऱ्यांना देखील पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पूर्ण समन्वय आहे. समान कार्यक्रमावर आम्ही काम करत आहोत, असे पवारांनी यावेळी स्पष्ट करत भाजपचा विशेषतः फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. 

Team Lokshahi News