मुंबई | महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या, उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत, MCED अर्थात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत दहा दिवसीय ऑनलाईन शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमासाठी १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून इच्छूकांनी अधिक माहितीसाठी MCED च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(अधिकृत संकेतस्थळ mced.co.in)
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना “MCED” या महाराष्ट्र शासन पुरस्कृत संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०२० असून ऑनलाइन नोंदणी करिता MCED लिंकला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी सुनील देसाई (विभागीय अधिकारी, एमसीईडी) मो. ९४२२२०६५४२ / ८६६९०५४०७८ / ०२२-२०८७०९५४ यांच्याशी संपर्क साधावा.