Bank Of Baroda मध्ये नोकरीची नवीन संधी; 1 फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज

मुंबई | सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी बॅंक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. (Bank of Baroda) ग्रामीण आणि कृषी बॅंकिंग विभाग व संपत्ती व्यवस्थापन सेवा विभागातील एकूण 105 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर एकूण 198 पदांसाठी आणखी दोन भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

बॅंकेने 12 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या भरतीच्या (Recruitment) जाहिरातीनुसार, कॅश मॅनेजमेंटमध्ये (Cash Management) 53 पदांची भरती करायची आहे आणि दुसऱ्या जाहिरातीनुसार, रिसिव्हेबल मॅनेजमेंटमध्ये (Receivable Management) 145 पदांची भरती करायची आहे. BOB ने जारी केलेल्या पूर्वीच्या जाहिरातीसाठी अर्ज प्रक्रिया 27 जानेवारी 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. दुसरीकडे, 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या दोन्ही भरती जाहिरातींशी संबंधित पात्र उमेदवारांकडून 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

रिसिव्हेबल मॅनेजमेंटमध्ये 145 पदांसाठी भरती
रिसिव्हेबल मॅनेजमेंटमधील 145 पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरातीद्वारे ज्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामध्ये एरिया रिसिव्हेबल मॅनेजरच्या 50 जागा, प्रादेशिक रिसिव्हेबल मॅनेजरच्या 48 जागा, झोनल रिसिव्हेबल मॅनेजरच्या 21 जागा आणि इतर पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार त्यांचे अर्ज बॅंक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर करिअर विभागात दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे 1 फेब्रुवारीपर्यंत सबमिट करू शकतात.

कॅश मॅनेजमेंटमध्ये 53 पदांची भरती
बॅंकेने जारी केलेल्या कॅश मॅनेजमेंटमधील 53 पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (AVP) – इक्विजिशनची 50 पदे आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (AVP) – प्रॉडक्‍टची 3 पदे आहेत. इच्छुक उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर प्रदान केलेल्या फॉर्मद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)