Photo credit https://www.dreamstime.com/
नवी दिल्ली। सध्या देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. त्याचा गरीब, शेतकरी आणि मजूर वर्गावर मोठा प्रभाव पडला आहे. यामुळे अनेकांना या परिस्थितीशी तोंड देताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यावर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच तब्बल ८.८९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ हजार ७९३ कोटी रूपये जमा केलेत. वर्षाला ६००० रूपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात देणारी ही योजना वर्षातील ३ हप्त्यात शेतकऱ्यांना याचे वाटप करते.
सध्या नवीन आर्थिक वर्ष २०२०-२१ सुरू झाले असून नव्या आर्थिक वर्षात ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. देशातील जवळपास १४.५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु अद्याप ९ कोटी शेतकऱ्यांचेच रजिस्ट्रेशन झाल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित ५.५ कोटी लोकांचे रजिस्ट्रेशन आणि त्यांना दिला जाणारा लाभ यावर्षी देण्याचे सरकारचे नियोजन आहे. तसेच ज्यांनी खोटी कागदपत्रे जमा करून याचा लाभ उठवला आहे, अशा शेतकऱ्यांची नावे वगळून नव्याने यादी जाहीर केली जाणार आहे.
योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पीएम – किसान (PM Kisan Scheme) योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात
आपली नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Farmers Corner वर आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाची माहिती वेळोवेळी घेतली पाहिजे.
यापध्दतीने पहा तपशील