Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर लॉकडाऊनची ‘ती’ निव्वळ अफवाच

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असला तरी ही कोरोना मुक्त होऊन बरे होणाऱ्या लोकांची संख्या चांगली असल्याने सध्यातरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कालपासून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कडक लॉकडाऊन होणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र सध्या तरी कोल्हापुरात कडक लॉकडाऊनचा विचार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात सर्व कोरोना रुग्णांवर उत्तम प्रकारे उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याच प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. लॉकडाऊन हा सर्वस्वी पर्यायनसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. त्यामुळे तूर्तास तरी लॉककडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Team Lokshahi News