Categories: Featured कृषी

सूक्ष्म सिंचनासाठी ‘८० टक्के’ अनुदान… पण कसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर

सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेची व्याप्ती राज्यभर :

मुंबई। ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येत आहे. सध्या ठराविक तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. आता ठराविक तालुक्यातील ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री पवार यांनी दिलीय. (मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना)

राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्याकरिता शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.  उर्वरित १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना  ८० टक्के अनुदान तसेच इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. याची सविस्तर माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली आहे.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, यापूर्वी दि. ०९ जुलै, २०१९ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार,  विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यांमधील सर्व तालुके तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा राज्यातील एकूण २४४ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वा तुषार सिंचन संच बसविण्याकरिता प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना देय असलेल्या ५५ टक्के अनुदानास २५ टक्के पूरक अनुदान देऊन एकूण ८० टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना कमाल ५ हेक्टर क्षेत्रासाठी देय ४५ टक्के अनुदानास ३० टक्के पूरक अनुदान देऊन ७५ टक्के अनुदान देण्यात येत आहे.

आता या योजनेंतर्गत राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनादेखील ८० टक्के अनुदान देण्याचा तसेच इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच १०७ तालुक्यांमध्ये शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा रु.७५ हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी निवेदनात सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार असून शेतीच्या अर्थकारणाला चांगली गती मिळणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: advantages of micro irrigation system micro irrigation in india micro irrigation in india upsc micro irrigation ppt micro irrigation project micro irrigation techniques micro irrigation types micro irrigation upsc ठिबक सिंचन अनुदान अर्ज ठिबक सिंचन अनुदान यादी ठिबक सिंचन अनुदान योजना 2018 -2019 ठिबक सिंचन अनुदान योजना 2019 ठिबक सिंचन एकरी खर्च तुषार सिंचन अनुदान 2019 तुषार सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र