Categories: अध्यात्म

नवरात्रीचे नऊ दिवस : जाणून घ्या मुहूर्त, विविध रूपातील पूजा आणि बरंच काही

यंदाचा नवरात्री महोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गादेवीच्या विविध शक्तीरूपांची विधीवत पूजा करण्याची परंपरा आहे. आणि याला भारतीय परंपरेनुसार विशेष महत्व देखील आहे. सर्व घरांमध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रम असतात. कधी जागरण कधी दांडिया असा हा सोहळा रंगतो. यंदा कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने या गोष्टींना काहीशी मर्यादा आली असली तरी लोकांचा उत्साह मात्र कायम आहे. हिंदू मान्यतांप्रमाणे नवरात्री ही वर्षातून चारवेळा येते. ज्यात चैत्र आणि शारदीय नवरात्री विशेष महत्वाची असते. तर दोन गुप्त नवरात्रीही असतात.

घटस्थानपेचा शुभमुहूर्त – 

हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. या वर्षी हा मुहूर्त पहिल्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२७ पासून ते सकाळी १०:१३ पर्यंत असणार आहे. तर घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त सकाळी ११:४४ पासून १२:२९ पर्यंत असणार आहे.

 • नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापना केली जाते. यासाठी…
  • पाण्याने भरलेला स्वच्छ पितळ, चांदी किंवा तांब्याचा कलश
  • पाणी असलेला चांगला नारळ
  • नारळ गुंडाळण्यासाठी लाल रंगाचे सुती कापड किंवा चुनरी
  • कुंकू
  • पाच ते सात आंब्याची पाने
  • लाल धागा
  • सुपारी, तांदूळ आणि नाणी

असा करा घटस्थापनेचा विधी –
घराच्या आग्नेय दिशेला चांगली जागा निवडून घटाची स्थापना करावी. आग्नेय दिशा ही पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते. कलश स्थापित करण्यासाठी मुहूर्तातच आधी श्रीगणेशाची पूजा करा. जिथे कलशस्थापना करायची आहे तिथे एक स्वच्छ लाल कापड घाला आणि नारळावर कापड गुंडाळून कुंकू किंवा चंदनाने स्वस्तिक काढा. कलशात गंगाजल भरा आणि त्यात आंब्याची पाने, सुपारी, हळकुंड, दुर्वा आणि पैसे घाला. कलशाच्या वर झाकण घालणार असाल तर झाकणात तांदुळ घाला, अन्यथा कलशात आंब्याची पाने घाला. यानंतर कलशावर नारळ ठेवा आणि दिवा लावून पूजा करा. देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूलाच कलशस्थापना करायची हे ध्यानात ठेवा.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची ‘या’ विविध रूपात केली जाते पूजा – 

 • १७ ऑक्टोबर – देवी शैलपुत्रीची पूजा आणि याच दिवशी घटस्थापना
 • १८ ऑक्टोबर – देवी ब्रह्मचारिणीची पूजा
 • १९ ऑक्टोबर – देवी चंद्रघटेची पूजा
 • २० ऑक्टोबर – देवी कुष्मांडाची पूजा
 • २१ ऑक्टोबर – देवी स्कंदमातेची पूजा
 • २२ ऑक्टोबर – देवी कात्यायनीची पूजा
 • २३ ऑक्टोबर – देवी कालरात्रीची पूजा
 • २४ ऑक्टोबर – देवी महागौरीची पूजा
 • २५ ऑक्टोबर – देवी सिद्धिदात्रीची पूजा
 • नवरात्रीचे नऊ रंग (२०२०)
  • १७ ऑक्टोबर – प्रतिपदा – राखाडी (Grey)
  • १८ ऑक्टोबर – द्वितिया – केशरी/नारंगी (Orange)
  • १९ ऑक्टोबर – तृतिया – पांढरा (White)
  • २० ऑक्टोबर – चतुर्थी – लाल (Red)
  • २१ ऑक्टोबर – पंचमी – निळा (Royal Blue)
  • २२ ऑक्टोबर – षष्ठी – पिवळा (Yellow )
  • २३ ऑक्टोबर सप्तमी- हिरवा (Green)
  • २४ ऑक्टोबर – अष्टमी – मोरपंखी (Peacock Green)
  • २५ ऑक्टोबर – नवमी – जांभळा (Purple)
Team Lokshahi News