Categories: बातम्या महिला राजकीय सामाजिक

जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी पुन्हा एकदा हाथरससाठी रवाना होणार आहेत. जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नसल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

याआधी गुरुवारी राहुल आणि प्रियांका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. त्यांना पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावी जायचे होते. यावेळी यूपी पोलिसांनी राहुल गांधींची कॉलर पकडली आणि झालेल्या धक्काबुक्कीत ते खाली पडले. यावेळी त्यांच्या हाताला इजा झाली. त्यानंतर यूपी पोलिसांनी कलम १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांना अटक केली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.

…आणि कोणत्याही भारतीयाने याचा स्वीकार करु नये
ती गोड मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारद्वारे होत असलेला व्यवहार मला स्वीकारार्ह नाही. कोणत्याही भारतीयाने याचा स्वीकार करु नये. असे ट्विट करत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

पीडितेच्या कुटुंबाला धमकावणे बंद करा – प्रियांका गांधी
‘यूपी सरकार नैतिकदृष्ट्या झाले आहे. पीडितेला उपचार मिळाले नाहीत. वेळेवर तक्रार नोंदवण्यात आली नाही. मृतदेह बळजबरीने जाळण्यात आला. पीडितेचे कुटुंबाला कैदेत ठेवले आहे. त्यांना दाबले जात आहे. आता त्यांना धमकी दिली जातेय की, त्यांची नार्को टेस्ट केली जाईल. हा व्यवहार देशाला स्वीकार नाही. पीडितेच्या कुटुंबाला धमकावणे बंद करा.

दरम्यान, बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे शिष्टमंडळ रवाना होणार आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लायवेवरील टोल प्लाझावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: BJP Congress hathras gang rape priyanka gandhi Rahul gandhi UP UP Police उत्तर प्रदेश सरकार कॉंग्रेस प्रियांका गांधी राहुल गांधी हाथरस बलात्कार प्रकरण