LPG subsidy
नवी दिल्ली। भारत हा जगात एलपीजी वापरणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील साधरणतः ८० टक्के लोक एलपीजीचा वापर आपल्या घरगुती स्वयंपाकासाठी करतात. यापाठीमागचे महत्वाचे कारण म्हणजे सरकारने यावर दिलेली सब्सिडी. परंतु अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांना सब्सिडी मिळत नाही. जर आपल्याला सब्सिडी मिळत नाही तर आपण ऑनलाईनद्वारे सब्सिडीसाठी अर्ज करु शकता, तसेच आपण एसएमएस किंवा वितरकाद्वारेही आपले आधार कार्ड जोडून सबसिडी मिळवू शकता. एलपीजी कनेक्शनला आधार कसा जोडायचा याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही एलपीजी उपभोक्ता असाल तर सब्सिडी आपल्या बँक खात्यात थेट जमा होते. पण त्यासाठी आधार कार्ड आपल्या कनेक्शनशी जोडलेले असावे. आधार जोडलेले नसेल तर सब्सिडी मिळणार नाही. परंतु याबाबत चिंता करण्याचे कारण नसून आता आपण घरबसल्या आपले आधार आपल्या कनेक्शनशी जोडू शकतो. आधार जोडण्याचे तीन पर्याय आहेत. एक आपण थेट आपल्या वितरकाकडे जावे आणि आधार जोडावे. किंवा आपण कॉल करुन करु शकतो, किंवा एक साधा एसएमएस करुन आधार जोडू शकतो. जर आपण आपल्या एलपीजी कनेक्शनशी आधार जोडले नाहीतर सब्सिडीला मुकावे लागेल. आपल्याला आधारची जोडणी करायची असेल तर खालील पद्धत पाहावी.-
असे जोडा आधार कार्ड – ऑनलाईन
इंडेन गॅस ग्राहक (Indane Gas customers) हे इंडेनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला आधार एलपीजी कनेक्शनशी लिंक करू शकतात @ http://indane.co.in/sms_ivrs.php. आता नंबरवर कॉल करण्यापूर्वी आपला जिल्हा क्रमांक शोधा आणि त्यानंतर ऑपरेटरच्या सूचनांचे अनुसरण करा.
भारत गॅस ग्राहक (Bharat Gas customers) हे www.ebharatgas.com/pages/Customer_Care/CC_IVRSInfo.html च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या एलपीजी कनेक्शनला आधार कार्ड लिंक करू शकतात. त्यानंतर वेबसाइटवर आयव्हीआरएस क्रमांकावर कॉल करा आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.
एचपी गॅस ग्राहक (HP Gas customers) हे www. www.hindustanpetroleum.com/hpanytime च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचे आधार कार्ड एलपीजी कनेक्शनशी लिंक करू शकतात. आयव्हीआरएस नंबरवर कॉल करा आणि सूचनांचे अनुसरण करा.
पद्धत अगदी सोपी आहे. आपल्याला केवळ आपल्या एलपीजी सेवा प्रदात्यास एक एसएमएस पाठवयाचा असतो. प्रथम, आपल्या एलपीजी वितरकासह आपल्या मोबाइल नंबरसह स्वतःची नोंदणी करा. आता आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवा.
भारत गॅस ग्राहक या नंबरवर एसएमएस पाठवू शकतात. 57333 (पुर्ण भारतासाठी) 52725 (Vodafone, MTNL, Idea, Airtel & Tata users)