Categories: Featured अर्थ/उद्योग

आता घरबसल्या करा सोने खरेदी आणि मिळवा वार्षिक २.५ टक्के व्याजासह करात सवलत

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्याने सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. परंतु आता घरबसल्या सोने खरेदी करण्याची सोय मोदी सरकारने उपलब्ध करून दिली असून २० एप्रिलपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या माध्यमातून ग्राहकांना सोने खरेदी करता येणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा सल्ला घेऊन भारत सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम २०२०-२१ (Sovereign Gold Bond Scheme)  जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड २० एप्रिल ते २ सप्टेंबरपर्यंत सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येतील. पहिला टप्पा २० ते २४ एप्रिल दरम्यान असणार आहे. याअंतर्गत कमीत कमी १ ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये ५००ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. या स्कीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकाल. त्याचप्रमाणे या योजनेत गुंतवणुकीवर वार्षिक २.५ टक्के व्याज मिळेल.

सॉव्हरेन गोल्ड म्हणजे काय?

या योजनेची सुरूवात भारत सरकारने नोव्हेंबर २०१५ पासून केली आहे. फिजिकल गोल्ड (Physical Gold)ची मागणी कमी करणे, त्याचप्रमाणे घरगुती बचतीऐवजी वित्तिय बचत करण्यास प्रोत्साहन देणे, हे या सोने खरेदीचं उद्दिष्ट्य आहे. घरामध्ये सोने खरेदी करून त्याची जोखीम पत्करण्या ऐवजी तुम्ही सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता आणि टॅक्स देखील वाचवू शकता.

याठिकाणी करा सॉव्हरेन गोल्डची खरेदी

सॉव्हरेन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट ऑफिस आणि एनएसई व बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या ३ दिवसात ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. याकरता ऑनलाइन अर्ज आणि पेमेंटची सुविधा उपलब्ध असून ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति तोळा सोन्यावर ५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sovereign gold bond 2020 sovereign gold bond calculator sovereign gold bond certificate not received sovereign gold bond hdfc sovereign gold bond rate today sovereign gold bond rbi sovereign gold bond returns आजचे सोन्याचे दर सोने खरेदी करताना घ्यावयाची काळजी सोने चांदी आजचा भाव सोन्याचा आजचा भाव 2020 सोन्याचा आजचा भाव 2020 मुंबई सोन्याचे आजचे भाव सोन्याचे आजचे भाव 2020 पुणे