Categories: Featured आरोग्य सामाजिक

आता कोरोना नियंत्रणाचा धारावी पॅटर्न ‘हा’ देश राबवणार

मुंबई | कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरलेल्या धारावी पटर्नचे WHO ने कौतुक केल्यानंतर आता हा पॅटर्न फिलिपीन्स सारख्या प्रगतशील देशात राबवला जाणार आहे. त्यासाठी फिलिपिन्स सरकारने मुंबई महापालिकेशी संपर्क साधला आहे. धारावीत कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी मंबई महापालिकेने जो पॅटर्न राबवला आहे तोच पॅटर्न फिलिपीन्स सरकारला त्यांच्या देशात असलेल्या झोपडपट्टी प्रदेशात वापरायचा आहे. फिलिपीन्समध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे आणि झोपडपट्टीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे फिलिपीन्स सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत माहिती दिली आहे. चहल यांनी सांगितले की, आमचे ध्येय एकच आहे. व्हायरसचा पाठलाग करा. जेणेकरुन त्याच्या शेवटच्या साखळीपर्यंत त्याचा शोध घेता येईल आणि त्याला रोखण्यात यश मिळेल. आम्ही धारावी येथे लागू केलेला पॅटर्न फिलिपिन्स सरकारही अंमलात आणू इच्छिते.

फिलिपिन्समधील न्यूज वेबसाईट इनक्वायररने दिलेल्या वृत्तानुसार, तिथल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, मुंबई येथील धारावी मॉडेल अतिशय चांगले आहे. आमच्याकडील लोकसंख्येची घनता विचारात घेता कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्हाला हा धारावी पॅटर्न लागू करावा लागेल. 

Team Lokshahi News