Categories: Featured अर्थ/उद्योग

इकडे लक्ष द्याः सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ विविध योजनांच्या व्याजदरांमध्ये केलीय कपात

नवीदिल्ली केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये प्रसिध्द असणाऱ्या विविध योजनांच्या व्याजदरांमध्ये कपात केलीय. सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालय ९ प्रकारच्या छोट्या बचत योजना प्रदान करते, यात सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र, सीनिअर सिटीझन बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश आहे. या योजनांवरील व्याज दरांची प्रत्येक तीन महिन्यांनंतर समिक्षा केली जाते. परंतु कोरोनामुळे या सर्व योजनांवर दिले जाणारे व्याज घटवण्यात आले आहे.

 • PPF सह लहान बचत योजनांवरील व्याज दरांमध्ये कपात
  • सरकारनं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सह लहान बचत योजनांवरील व्याज दर २०२०-२१ च्या पहिल्या तिमाही साठी १.४ टक्क्यांनी कमी केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, विविध लघू बचत योजनांवरील व्याजदर आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या एप्रिल-जून या तिमाहीसाठी संशोधित केले आहेत.
 • PPF, NSC च्या व्याज दरांमध्ये कपात
  • पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र म्हणजेच एनएससीवरील व्याज दरांमध्ये क्रमश: ०.८ आणि १.१ टक्क्यांनी कपात केली गेलीय. या कपातीनंतर २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत पीपीएफवर ७.१ टक्के, तर एनएससी वर ६.८ टक्के व्याज असेल.
 • किसान विकास पत्रवर आता . टक्के व्याज
  • किसान विकास पत्रावर आता ६.९ टक्के व्याज मिळेल, जे आतापर्यंत ७.६ टक्के होतं. तर नवीन व्याज मिळण्याचा मुदतीचा कालावधी १२४ महिने करण्यात आलाय, जो पूर्वी ११३ महिने होता.
 • सुकन्या योजनेत आता . टक्के व्याज
  • सुकन्या समृद्धी योजनेवर २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत ७.६ टक्क्यांनी व्याज मिळणार आहे. आतापर्यंत या योजनेवर ८.४ टक्क्यांनी व्याज मिळत होतं.
 • तीन वर्षांपर्यंत जमा असलेल्या रकमेवर आता . टक्के व्याज मिळेल
  • या योजनांवरील व्याज कपातीनंतर एक ते तीन वर्षांच्या कालावधीत एफडी असलेल्या रकमेवर आता ५.५ टक्के व्याज मिळेल. आतापर्यंत हा दर ६.९ टक्के होता.
 • पाच वर्षांपर्यंतच्या रकमेवर . टक्के व्याज मिळेल
  • पाच वर्षांसाठी (एफडी) जमा असलेल्या रकमेवरील व्याज कमी होऊन ते ६.७ टक्के झालंय. आतापर्यंत हे व्याज ७.७ टक्के होतं. या सेव्हिंग्जवर व्याज दर तीन महिन्यांनी दिलं जातं. पाच वर्षांच्या रेकरिंग जमा ठेवींवरील व्याज दरात १.४ टक्क्यांनी कपात केली गेलीय. या कपातीनंतर नवा दर ५.८ टक्के असेल.
 • सेव्हिंग्ज अकाऊंटवरील व्याज दर कायम
  • बचत खात्यावरील व्याज दर कायम ठेवले गेले आहेत. म्हणजे या तिमाहीत सुद्धा हा दर ४ टक्के असेल.
 • सीनिअर सिटिझन बचत योजनेवरील व्याज . टक्क्यांनी कमी
  • सीनिअर सिटिझन बचत योजनेच्या पाच वर्षांच्या कालावधीतील व्याज १.२ टक्क्यांनी कमी झाल्याने आता ते ७.४ टक्क्यावर आले आहे. आतापर्यंत ८.६ टक्के व्याज मिळत होतं. या योजनेवर सुद्धा व्याज तिमाहीच्या आधारे दिलं जातं.
Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: किसान विकास पत्र सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) सीनिअर सिटीझन बचत योजना सुकन्या समृद्धी योजना