Categories: Featured

१६ ऑक्टोबर २०२० : कोल्हापूर कोरोना रिपोर्ट

कोल्हापूर | जिल्ह्यात आज कोरोनाचे ८४ रूग्ण सापडले आहेत, यामुळे आजअखेर कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ४७ हजार २११ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत यापैकी ४२ हजार ८६५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. असे असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवाल याप्रमाणे –  

  • आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ५०७ प्राप्त अहवालापैकी ४७४ निगेटिव्ह तर २९ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (४ अहवाल नाकारण्यात आले)
  • ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे १४३ प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह १३३ तर १० पॉझीटिव्ह.
  • खासगी रुग्णालये/लॅब मध्ये २११ प्राप्त अहवालापैकी १६६ निगेटिव्ह तर ४५ पॉझीटिव्ह  असे एकूण ८४ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

आजच्या पॉझिटिव्ह रूग्णांची तालुका निहाय संख्या – 
आजरा ३, भुदरगड ४, चंदगड २, हातकणंगले ७, करवीर १६, पन्हाळा १, शाहूवाडी १, नगरपरिषद क्षेत्र १४, कोल्हापूर महापालिका क्षेत्र २८ व इतर शहरे व राज्य ८ असा समावेश आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण २ हजार ७५८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत १ हजार ५८८ रूग्णांचा मृत्यु झाला आहे. 

Team Lokshahi News