Categories: शिक्षण/करिअर

टपाल विभागाकडून आर्थिक कमाईची संधी; ‘ही’ आहे पात्रता आणि ‘असा’ करा अर्ज..!

कोल्हापूर | टपाल विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिक कमाईची चांगली संधी उपलब्ध करून दिली असून थेट अभिकर्ता पदासाठी काम करण्याची संधी दिली आहे. टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमाकरिता ही भरती केली जाणार असून इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्जासह १९ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर डाकघर येथे आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजाच्या सत्यप्रतीसह उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी केले आहे.

  • थेट अभिकर्ता पदासाठी पात्रता
    • टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्त्यांसाठी उमेदवारांचे वय कमीत-कमी १८ वर्षे व जास्तीत-जास्त ६० वर्षे असावे.
    • मान्यताप्राप्त केंद्रीय/राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थांमधून १०+२ उत्तीर्ण
    • आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक
    • बेरोजगार / स्वयं रोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार / कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहाय्यता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमाकरिता अभिकर्तासाठी आवेदन करू शकतात.
  • अधिक माहितीसाठी टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्याhttps://www.indiapost.gov.in

जो उमेदवार थेट अभिकर्तासाठी निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. थेट मुलाखतीव्दारे टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परीक्षेसाठी हजर रहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.

नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता २५० रू. आणि परवाना परीक्षेसाठी ४०० रू. फी म्हणून जमा करावे लागतील. निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला ५ हजार रू. टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र /‍ किसान विकास पत्रमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: how to calculate income tax on kisan vikas patra how to encash kisan vikas patra after maturity kisan vikas patra 2020 kisan vikas patra calculator 2020 kisan vikas patra in hindi kisan vikas patra online purchase sbi kisan vikas patra rate of interest 2020 kisan vikas patra withdrawal rules POMIS post office kisan vikas patra scheme किसान विकास पत्र किसान विकास पत्र मागे घेण्याचे नियम किसान विकास पत्र व्याजाचा २०२० दर पोस्ट ऑफिस RD पोस्ट ऑफिस इंटरेस्ट रेट्स टेबल पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना पोस्ट ऑफिस चाइल्ड प्लान पोस्ट ऑफिस डबल मनी स्कीम पोस्ट ऑफिस भविष्य निधि योजना पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम 2020 पोस्ट ऑफिस योजना 2019 पोस्ट ऑफिस स्कीम 2019 प्रधानमंत्री बचत योजना भारतीय डाक की नई स्कीम वरिष्ठ नागरिकों के लिए डाकघर मासिक आय योजना सबसे अच्छी बचत योजना सबी मंथली इनकम स्कीम कैलकुलेटर