मुंबई | उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway, Railway Recruitment Cell NFR – RRC) अंतर्गत रिक्त जागांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northeast Frontier Railway Apprentice Recruitment 2022) जारी केली आहे.

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार (फिटर, वेल्डर (G&E), इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल). अशी एकूण 5636 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शिकाऊ उमेदवार (Apprentice) – 

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • नॅशनल कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.
  • नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र असावे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये SC/ST/PWD/महिलांसाठी – शुल्क नाही
अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://nfr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.