पुणे | कोणत्याही शाखेतील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काम करताना शिकण्याची संधी टाटा मोटर्सने उपलब्ध करून दिली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत मुलांना शिक्षण घेत असतानाच काम करण्यास आमंत्रित केले जात आहे.

टाटा मोटर्स पुणे येथे एनटीटीएफच्या माध्यमातून कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत Diploma In Manufacturing Technology हा अभ्यासक्रम मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन पूर्ण करता येणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना 12 हजार 850 रुपये विद्यावेतन दिले जाईल. त्याचबरोबर कँटीन (1 वेळचे जेवण, 2 वेळचा चहा, नाश्ता महिना 15 रुपये फक्त), मोफत बस सुविधा, गणवेश, सेफ्टी शूज, आरोग्य विमा आदी सुविधा मिळणार आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्ष आहे.

अधिक माहितीसाठी 9325320327, 8793508280, 7397802522, 9834920764, 9021719017, 7758928182, 9890247566 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.