Categories: अर्थ/उद्योग कृषी

धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश

सोलापूर। शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेत देत नसलेल्या साखर कारखानदारांविरूध्द साखर आयुक्तांनी  कडक कारवाईला सुरवात केली असून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश दिलेत. हा कारखाना माजी खासदार आणि भाजपचे उपप्रदेशाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या ताब्यात आहे. 

मा. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी, भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिंकदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर या कारखान्याकडील सन २०१८-२०१९ च्या हंगामामधील गाळप उसाचे थकीत रु. १३२९. ८२ लाख (रुपये तेरा कोटी, एकोणतीस लाख ब्याऐंशी हजार फक्त) तसेच कलम ३(३ ए) नुसार सदर रक्कमेवर १५% दराने देय रक्कम थकीत असल्याने कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादीत केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इ. उत्पादनाची विक्री करून त्यामधून सदर रक्कम वसूल करण्यात यावी तसेच, कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेवर दस्तऐवजावर शासनाच्या नावाची नोंद करावी, असे आदेश दिले आहेत.

RRC-2018-19-Bhima-Takali-20.1-2020

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Sugar Factory sugar industry धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखाना शेखर गायकवाड साखर आयुक्त साखर आयुक्त कारवाई