Categories: कृषी

… अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता!

पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पण…

नवी दिल्ली | पीएम किसान  योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील १० कोटी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देत असून याचा सर्वच शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. या योजनेत देशातील आणखी ४.५ कोटी शेतकऱ्यांना जोडण्याचे सरकारचे उद्धिष्‍ट असून काही तांत्रिक कारणास्तव या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेपासून अद्याप वंचित रहावे लागत आहे. 

पीएम किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहे. सध्या जे १० कोटी शेतकरी लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचे रेकॉर्ड चुकीचे असल्याचे ध्यानात येत असल्याने अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे बंद केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने बॅंक खाते आणि आधार कार्ड यावर असणाऱ्या नावातील शब्दांच्या (Spelling) चुका, बॅंकेच्या आयएफएससी कोड (IFSC Code) मधील चुका, बॅंकेचा खाते नंबर (Bank Account No.) चुकणे, जमीनच्या कागदपत्रातील (7/12), आधार कार्ड वरील (Aadhar Card) तसेच बॅंकेतील (Bank Account Name) नावात असणाऱ्या किरकोळ चुका या बाबींमुळे हे घडत आहे.

सरकारकडून बोगस लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी कडक उपाययोजना केल्या जात असून योग्य शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. येत्या १ ऑगस्ट पासून या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असून तांत्रिक चुका असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना मात्र सहावा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे तांत्रिक चुका असतील तर त्या ३१ जुलै पूर्वीच दुरूस्त करून घेतल्यास शेतकऱ्यांना सहावा हप्ता मिळणे शक्य होणार आहे.

  • या’ शेतकऱ्यांवर होणार कारवाई :
    • काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक पात्रता नसताना लाभ उकळल्याचीही काही उदाहरणे समोर आल्याने अशा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले पैसे वसूल करण्याचे कामही सरकारी पातळीवर सुरु करण्यात आले आहे. अनेक राज्यात बोगस लाभ उकळणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे पैसे सरकारने परत घेतले असून यातील जबाबदार शेतकरी आणि सरकारी यंत्रणेतील दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

जर अशा चुका असतील तर त्या वेळीच दुरुस्त करणे गरजेचे आहे. ह्या चुका आपण घरी बसूनही दुरुस्त करु शकता. त्यासाठी PM-Kisan योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) जाऊन या दुरूस्त्या कराव्या लागतील. संकेतस्थळावर गेल्यानंतर यातील फार्मर कॉनवर Edit Aadhaar Detail या पर्यायावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर टाका. तसेच समोरील कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. जर आपले नाव चुकीचे अपलोड असेल म्हणजेच अर्जावरील आणि आधारवरील नाव वेगवेगळे असेल तर डाटा ओपन होईल. त्यानंतर झालेल्या चुका आपण ऑनलाईन घरी बसून निट करू शकता. जर अजून काही चुका असतील तर आपण कृषी विभाग, तहसिलदार, तलाठी कार्यालय, कॉमन सर्वीस सेंटर यांच्याशी संपर्क साधून देखील दुरूस्त करून घेऊ शकता.

Team Lokshahi News