Categories: आरोग्य सामाजिक

आता ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिळणार रुग्णवाहिकेचा दर्जा

मुंबई | कोरोना उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने जारी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे निर्देश दिलेत. त्यानुसार ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सायरन असणार आहे. तसेच रुग्णवाहिकेसारखा समकक्ष दर्जा असणाऱ्या या वाहनांची वाहतूकही रोखता येणार नाही.

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. तसेच आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आपत्ती व्यवस्थापनातंर्गत कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. या वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १०८ मधील तरतूदी लागू करण्यात येत असल्याचे गृह विभागाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Team Lokshahi News