Categories: Featured

बीजमाता राहिबाई पोपेरे, हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांंच्यासह सर्व ‘पद्म’ पुरस्कारांची यादी पहा

नवीदिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण २२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे, अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा समावेश आहे. 

देशी बियाणांचं जतन करून बियाणांची बँक स्थापन करणाऱ्या ‘मदर ऑफ सीड’ अर्थात बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्यचा यथोचित गौरव यानिमित्ताने झाल्याचे पहायला मिळत आहे. राहीबाईंनी संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. दुर्मिळ झालेल्या देशी वाणांचं संवर्धन केलं. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवलं आहे. राहीबाई पोपेरे यांच्याबरोबर आदर्श गाव योजनेचे पुरस्कर्ते पोपटराव पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार

नावक्षेत्र
जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर)सार्वजनिक सेवा
अरुण जेटली (मरणोत्तर)सार्वजनिक सेवा
अनिरुद्ध जगन्नाथसार्वजनिक सेवा
एम. सी. मेरिकोमक्रीडा
छु्न्नालाल मिश्राकला
सुषमा स्वराज (मरणोत्तर)सार्वजनिक सेवा
श्री. विश्वेशतीर्थ स्वामी पेजावर (मरणोत्तर)अध्यात्म

पद्मभूषण पुरस्कार

नावक्षेत्र
एम. मुमताझ अलीअध्यात्म
सय्यद मुअझ्झीम अली (मरणोत्तर)सार्वजनिक सेवा
मुजफ्फर हुसैन बेगसार्वजनिक सेवा
अजय चक्रवर्तीकला
मनोज दाससाहित्य आणि शिक्षण
कृष्णाम्मल जगन्नाथनसमाजसेवा
एस. सी जमीरसार्वजनिक सेवा
अनिल प्रकाश जोशीसमाजसेवा
त्सेरिंग लांडोलवैद्यकीय सेवा
आनंद महिंद्राव्यापार आणि उद्योग
नीलकंठ रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर)सार्वजनिक सेवा
मनोहर पर्रिकर (मरणोत्तर)सार्वजनिक सेवा
जगदीश शेठसाहित्य आणि शिक्षण
पी. व्ही. सिंधूक्रीडा
वेणू श्रीनिवासनव्यापार आणि उद्योग

पद्मश्री पुरस्कार

विजेतेक्षेत्र
गुरू शशधर आचार्यकला
योगी एरॉनवैद्यकीय सेवा
जय प्रकाश अगरवालव्यापार आणि उद्योग
जगदीश लाल अहुजासमाजसेवा
काझी मासूम अख्तरसाहित्य आणि शिक्षण
ग्लोरिया अरिएरासाहित्य आणि शिक्षण
झहीर खानक्रीडा
पद्मावती बंडोपाध्यायवैद्यकीय सेवा
सुशोभन बॅनर्जीवैद्यकीय सेवा
दिगंबर बेहेरावैद्यकीय सेवा
दमयंती बेशरासाहित्य आणि शिक्षण
पोपटराव पवारसमाजसेवा
हिंमत राम भांभूसमाजसेवा
संजीव भिकचंदानीव्यापार आणि उद्योग
गफुरभाई एम, बिलखियाव्यापार आणि उद्योग
बॉब ब्लॅकमनसार्वजनिक सेवा
इंदिरा पी. पी. बोराकला
मदन सिंग चौहानकला
उषा चौमारसमाजसेवा
लीलबहादूर छेत्रीसाहित्य आणि शिक्षण
ललिता आणि सरोजा चिदंबरमकला
वजिरा चित्रसेनाकला
पुरुषोत्तम दधिचकला
उत्सव चरण दासकला
इंद्रा दासनायकेसाहित्य आणि शिक्षण
एच.एम. देसाईसाहित्य आणि शिक्षण
मनोहर देवदासकला
ओंइनाम बेंबेम देवीक्रीडा
लिया दिस्किनसमाजसेवा
एम. पी. गणेशक्रीडा
बंगलोर गंगाधरवैद्यकीय सेवा
रमण गंगाखेडकरविज्ञान आणि अभियांत्रिकी
बॅरी गार्डीनरसार्वजनिक सेवा
चेवांग मोटुप गोबाव्यापार आणि उद्योग
भरत गोयंकाव्यापार आणि उद्योग
यादला गोपालरावकला
मित्रभानू गौंतियाकला
तुलसी गौडासमाजसेवा
सुजॉय के. गुहाविज्ञान आणि अभियांत्रिकी
हरेकला हजब्बासमाजसेवा
इनॅमुल हकइतर – पुरातत्वशास्त्र
मधु मन्सुरी हसमुखकला
अब्दुल जब्बार (मरणोत्तर)समाजसेवा
बिमल कुमार जैनसमाजसेवा
मीनाक्षी जैनसाहित्य आणि शिक्षण
नेमनाथ जैनव्यापार आणि उद्योग
शांती जैनकला
सुधीर जैनविज्ञान आणि अभियांत्रिकी
बेनीचंद्र जमातियासाहित्य आणि शिक्षण
के. व्ही. संपत कुमार आणि विदुषी जयलक्ष्मीसाहित्य आणि शिक्षण
करण जोहरकला
लीला जोशीवैद्यकीय सेवा
सरिता जोशीकला
सी. काम्लोवासाहित्य आणि शिक्षण
रवी कन्नन आरवैद्यकीय सेवा
एकता कपूरकला
याझदी नवशिर्वान करंजियाकला
नारायण जोशी कारायलसाहित्य आणि शिक्षण
डॉ. नरिंदर नाथ खन्नावैद्यकीय सेवा
नवीन खन्नाविज्ञान आणि अभियांत्रिकी
एस. पी. कोठारीसाहित्य आणि शिक्षण
व्ही. के. मुनुस्वामी कृष्णपक्तरकला
एम. के. कुंजोलसमाजसेवा
मनमोहन महापात्रा (मरणोत्तर)कला
उस्ताद अन्वर खान मंगनियारकला
कट्टुनगल सुब्रह्मण्यम मनिलालविज्ञान आणि अभियांत्रिकी
मुन्ना मास्टरकला
प्रा. अभिराज राजेंद्र मिश्रसाहित्य आणि शिक्षण
बिनापानी मोहंतीसाहित्य आणि शिक्षण
डॉ. अरुणोदय मंडलवैद्यकीय सेवा
डॉ. पृथ्विंद्र मुखर्जीसाहित्य आणि शिक्षण
सत्यनारायण मुंदायूरसमाजसेवा
मणिलाल नागकला
एन. चंद्रशेखर नायरसाहित्य आणि शिक्षण
डॉ. टेटसू नाकामोरा (मरणोत्तर)समाजसेवा
शिव दत्त निर्मोहीसाहित्य आणि शिक्षण
पु लालबियाकथांगा पाचाऊसाहित्य आणि शिक्षण – पत्रकारिता
मुळीक्कल पंकजाक्षीकला
डॉ. प्रशांत कुमार पटनायकसाहित्य आणि शिक्षण
जोगेंद्र नाथ फुकानसाहित्य आणि शिक्षण
राहीबाई सोमा पोपेरेइतर – कृषी
योगेश प्रवीणसाहित्य आणि शिक्षण
जितू रायक्रीडा
तरुणदीप रायक्रीडा
एस. रामाकृष्णनसमाजसेवा
रानी रामपालक्रीडा
कंगना राणौतकला
दलवाई चलपती रावकला
शहाबुद्दीन राठोडसाहित्य आणि शिक्षण
कल्याण सिंह रावतसमाजसेवा
चिंतला व्यंकट रेड्डीइतर – कृषी
डॉ. शांती रॉयवैद्यकीय सेवा
राधामोहन आणि साबरमतीइतर – कृषी
बटकृष्ण साहूइतर – पशु संवर्धन
त्रिनिती सायूइतर – कृषी
अदनान सामीकला
विजय संकेश्वरव्यापार आणि उद्योग
डॉ. कुशल कोनवार सर्मावैद्यकीय सेवा
सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाईसमाजसेवा
मोहंमद शरीफसमाजसेवा
श्याम सुंदर शर्माकला
डॉ. गुरदीप सिंगवैद्यकीय सेवा
रामजी सिंहसमाजसेवा
वशिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर)विज्ञान आणि अभियांत्रिकी
दया प्रकाश सिन्हाकला
डॉ. सँड्रा देसा सूझावैद्यकीय सेवा
विजयसारथी श्रीभाष्यमसाहित्य आणि शिक्षण
कली शबी महबूब आणि शेख महबूब सुबाणीकला
जावेद अहमद तकसमाजसेवा
प्रदीप थलप्पीलविज्ञान आणि अभियांत्रिकी
येशे दोर्जी थोंग्चीसाहित्य आणि शिक्षण
रॉबर्ट थुर्मनसाहित्य आणि शिक्षण
अॅगस इंद्र उदयनासमाजसेवा
हरीश चंद्र वर्माविज्ञान आणि अभियांत्रिकी
सुंदरम वर्मासमाजसेवा
डॉ. रोमेश टेकचंद वाधवानीव्यापार आणि उद्योग
सुरेश वाडकरकला
प्रेम वत्साव्यापार आणि उद्योग
Team Lokshahi News