Categories: गुन्हे

पालघर : शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया काळ्याबाजारात जाऊ नये यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या पत्रकाराला मारहाण

पालघर | शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया काळ्याबाजारात जाऊ नये यासाठी जीव जोखमीत घालून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारालाच काळाबाजार करणाऱ्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना असून मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पालघर तालुक्यातील बोईसर येथील कुडण याठिकाणी वडापाव विक्रेत्याला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी यांच्यासह तिघांविरोधात तारापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्याचा आधार घेत चांदेकर यांनी मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून बातमी प्रसिध्द केली. त्याच गोष्टीचा राग सुशिल चुरी यांच्या मनात होता. याबरोबरच योगेश चांदेकर काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात युरियाचा होणारा काळा बाजार याच्याही बातम्या करत असल्याची चुरी याना माहिती होती. त्यामुळे काळ्याबाजारात जाणाऱ्या युरिया साठ्याचीही माहिती दिल्यास चांदेकर बोलावेल त्या ठिकाणी येऊ शकतो याची खात्री असल्याने तसा कट रचून चांदेकर यास बोलावून मारहाण करण्यात आली आहे. तशी तक्रार चांदेकर यांनी सुशील चुरी व समर्थकांविरोधात केली आहे. 

  • जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुशील चुरी व सहकाऱ्यांनी वडापाव विक्रेत्याला केलेल्या मारहाणीची बातमी केल्याप्रकरणी मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना कट रचून मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी योगेश चांदेकर यांनी सुशील चुरी, पिंटू चुरी आणि इतर ५ ते ६ सहकाऱ्यांविरोधात 143, 144, 145, 148, 149, 324 कलमांतर्गत तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून समोर आलेल्या खुलाशांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान आपल्याला सोबत नेणाऱ्या तरुणाने वाडीच्या बाहेर गाडी थांबवत मी आत पाहून आलो असे सांगत ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर पोबारा केला, त्याचवेळी अचानक आलेल्या सुशील चुरी, पिंटू चुरी व ५-६ अनोळखी इसमांनी आपणांस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मारत-मारतच आपणांस पोलीस ठाण्यात नेण्यात आले असे चांदेकर यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे विनयभंगाचा आरोप हा जाणीवपूर्वक करण्यात आला असून कट रचून आपणांस बदनाम करण्यात आल्याची माहिती चांदेकर यांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया काळ्याबाजारात जाऊ नये यासाठी जीव जोखमीत घालणाऱ्या पत्रकाराला अशाप्रकारे बदनाम केले जाणे चुकीचे असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळावा अशी शेतकरी व ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Team Lokshahi News