Categories: Featured

लातूर : नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करा; राज्यमंत्र्याचे निर्देश

लातूरगेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने उदगीर, जळकोट परिसरातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तुर, मुग, सोयाबीन, या पीकांचा समावेश असून नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या तोगरी, मोघा, रावणगाव या परिसरात मागील आठवड्यात ढगफुटी सद्श्य पाऊस झाल्याने प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १२५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले.  यावेळी सुमारे ७४० मी.मी पावसाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस, वातावरणातील आर्द्रता, यामुळे सोयाबीन पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन पीकास त्यांच्या शेंगातूनच कोंब फुटत आहेत, तर मुगाचीही प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे शासकीय पातळीवरून पंचनामे करण्याचे निर्देशराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

एकीकडे लातूर जिल्ह्यात पाण्याची कमतरता जाणवत असताना काही ठिकाणी मात्र सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सर्वच बाबतीत अडचणीत येत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. 

Team Lokshahi News