PM awas Scheme
नवी दिल्ली। देशातील प्रत्येकाचे घराचे स्वप्न पुर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. ३१ मार्च २०२२ पर्यंत २ कोटी घरे निर्माण करण्याचे लक्ष्य त्यावेळी सरकारने निश्चित केले होते. त्यानुसार या योजनेअंतर्गत, जर कोणी प्रथमच घर विकत घेत असेल तर त्याला क्रेडिट लिंक्ड सब्सिडी दिली जाते. घर खरेदी करण्यासाठी गृह कर्जावरील व्याजावर अनुदान, या अनुदानाची राशी २.६७ लाखांपर्यंत असेल असे सरकारने निश्चित केले आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत (PM Awas) राबवली जाते.
कॅटेगिरीनुसारमिळेलसब्सिडीचालाभ
३ लाख ते ६ लाख वर्षाचे उत्पन्न असलेले व्यक्ती इकोनॉमिकली वीकर सेक्शन (EWS) आणि लोअर इनकम ग्रुप (LIG) वाले यांना अनुदानाचा लाभ हा ३१ मार्च २०२२ पर्यंत मिळेल. पण मध्यमवर्गीय इनकम ग्रुप १ आणि मध्यमवर्गीय इनकम ग्रुप २ (१२ ते १८ लाख वर्षाचे उत्पन्न कमावणारे) मधील लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२० पर्यंत अर्ज करणाऱ्यांनाच या सब्सिडीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान या दोन्ही गटातील लोकांना सब्सिडीचा लाभ मिळण्याची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी होत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने लॉकडाऊन उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे. लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर आपल्या या योजनेसाठी अर्ज करता येईल.
आवश्यककागदपत्रे
पगारनसलेलावर्ग
ओळख पुरावा, पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारकडून देण्यात आलेले ओळख पत्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून असलेले पत्र. राहण्याचा पत्ता, मतदान कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिल, यात टेलिफोन बिल, गॅसचे बिल, विज बिल. कमर्शियल नॅशनलाइज्ड बँकेकडून मागील ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट, पोस्ट ऑफिसमधील सेव्हिंग खात्यावरील पत्ता, जीवन विमा पॉलिसी, रहिवाशी दाखला. पासबुक वरील पत्ता, आपले दुकान, फर्म, कंपनी मालकीच्या बाबतीत पत्ता पुरावा.