Categories: कृषी बातम्या

PM किसान : १५ दिवसानंतर येतील तुमच्या खात्यात २००० रूपये; तत्पूर्वी करा हे महत्वाचे काम

नवी दिल्ली | पीएम किसान योजेनतील ११. १७ कोटी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. येत्या १५ दिवसानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेतील हप्त्याचे २००० रूपये जमा झाल्याचे पहायला मिळेल. पीएम किसान योजनेतील सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात १ डिसेंबर नंतर मिळणार आहे. याचा लाभ आणखी ३.३३ कोटी शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे. परंतु काही तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना या योजनेतील पैशांवर पाणी सोडावे लागू शकते, त्यामुळे लगेचच आपल्या खात्याची माहिती अपडेट असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

याबरोबरच पीएम किसान योजनेतील घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आल्याने सरकारच्या वतीने कडक उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे अशा शेतकऱ्यांना देखील छोट्याशा चुकीमुळे या योजनेच्या लाभावर पाणी सोडावे लागणार आहे. ही बाब ध्यानात घेऊन लाभार्थी शेतकऱ्यांनी ताबडतोब आपले नाव पीएम किसान योजनेच्या पात्रता यादीतून वगळले नसल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून आपले नाव वगळले नसल्याची खात्री करून घेण्यासाठी लाभार्थी यादी किंवा लाभार्थी स्थिती या लिंकवर क्लिक करून आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. (लाल अक्षरांवर क्लिक करून आधार नंबर, मोबाईल नंबर अथवा बॅंक खाते क्रमांक याच्या सहाय्याने ही माहिती तपासा)

१५ दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये येतील २ हजार रुपये

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेसाठी सरकारने आत्तापर्यंत ९५ हजार कोटी रूपयांचा निधी वितरीत केला आहे. सरकारच्या वतीने या योजनेचा लाभ ११.१७ कोटी शेतकऱ्यांना दिल्याची अधिकृत नोंद आहे. तर जवळपास १४.५ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याने आणखी ३.३३ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी स्वतः या योजनेत नाव नोंदवण्याचे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी पीएम किसानच्या वेबसाईट वर स्वतः शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी खास पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

ज्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे, अशा शेतकऱ्यांना आपल्या खात्याचा तपशील पुन्हा एकदा तपासणे गरजेचे आहे. कारण पीएम किसान योजनेत अपात्र लोकांनी देखील लाभ उकळल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारच्या वतीने नियम कडक केले जात आहेत. त्यामुळे थोडीशी चूक देखील लाभार्थी शेतकऱ्यांना महागात पडू शकते. नावातील स्पेलिंगच्या चुका, आधार कार्ड आणि बॅंक पासबुक मधील चुका, आयएफएससी कोडच्या चुका, खाते क्रमांकाच्या चुका अशा किरकोळ चुकांमुळे देखील अनेक शेतकऱ्यांचे हप्ते अर्ध्यावरच मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आपल्या खात्यातील चुकांची पडताळणी करून घेणे फायद्याचे ठरणार आहे.

 • या’ शेतकऱ्यांवर सुरू आहे कारवाई :
  • काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक पात्रता नसताना लाभ उकळल्याचीही काही उदाहरणे समोर आल्याने अशा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले पैसे वसूल करण्याचे कामही सरकारी पातळीवर सुरु करण्यात आले आहे.

कृषि मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १.१३ कोटी शेतकऱ्यांना केवळ अशा तांत्रिक चुकांमुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. नावनोंदणी करून देखील त्यांना आता या योजनेतून पैसे मिळत नाहीत. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरील
नवीन नाव नोंदणी,
आधार अपडेट,
लाभार्थी स्थिती,
लाभार्थी यादी,
स्वत: नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती,
स्वतः नोंदणी केलेल्यांसाठी चुकांची दुरूस्ती,
किसान क्रेडीट कार्ड साठी नोंदणी फॉर्म या पर्यायांचा वापर करून लाभ मिळवणे शक्य आहे. 

घरबसल्या मोबाईलवरून स्वत:च करा नोंदणी

 • पीएम किसान वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘Farmers Corner’ निवडा.
  • ‘नवीन शेतकरी नोंदणी’वर क्लिक करा.
  • एक नवीन टॅब उघडली जाईल.
  • येथे आपला आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका, ‘Click here to continue’वर क्लिक करा’.
  • त्यानंतर आपल्या नोंदणीसाठी फॉर्म उघडेल.
  • याठिकाणी जमिनीची माहिती देण्यासाठी सर्वे नंबर, खाते नंबर, खसरा क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्र याची माहिती भरा
  • यानंतर ‘Save’ वर क्लिक करा, अशा प्रकारे घरबसल्या तुमची तुमची नोंदणी पूर्ण करा.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 24000 rupees pm kisan 6000 RUPEES PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना