Categories: Featured कृषी

PM किसानः सांगली जिल्ह्यातील २ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५३ कोटी रुपये जमा

सांगली। अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० रूपये देण्यास सुरवात केलीय. फेब्रुवारी २०१९ पासून याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळू लागला आहे. २ हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. 

या योजनेतून सांगली जिल्ह्यातील २ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५३ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. या योजनेसाठी सांगली जिल्ह्यातील पात्र खातेदारांची संख्या ४ लाख ९७ हजार आहे. तर ३ लाख ९५ हजार प्रस्तावापैकी आजअखेर ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाउन अर्ज पात्र ठरले आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील वर्षीच्या थकबाकीसह दोन-दोन हप्ते जमा केले आहेत. सध्या सांगली जिल्ह्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ७० हजार ५१९ एवढी आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर