Categories: Featured कृषी

PM किसानः सरकारने पुढील हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना पाठवला ‘हा’ महत्वाचा संदेश, आहे खूप फायदेशिर!

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकरी घेत आहेत. दरवर्षी ६००० रूपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात देणारी ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.

या योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर नुकताच एक संदेश पाठवला असून या महत्वपूर्ण संदेशात शेतकऱ्यांना काही गोष्टींबाबत सूचित केले आहे. या योजनेतून ऑगस्टपासून २००० रूपयांचा हप्ता पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला आहे. यासंदेशामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

सरकारकडून पाठवण्यात आलेल्या संदेशात एक लाभार्थ्यांना एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. लाभार्थी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून त्यांच्या अर्जाची, खात्याची स्थिती जाणून घेऊ शकतात. शेतकऱ्यांना पाठवलेल्या संदेशात असे लिहिले आहे, “प्रिय शेतकरी, आता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पीएम किसानच्या ०११-२४३००६०६ या क्रमांकावर कॉल करून जाणून घेऊ शकता.”

या योजनेचा आत्तापर्यंत ९.५४ कोटी शेतकऱ्यांची डाटा पडताळणी झाली आहे. तर १.३ कोटी शेतकऱ्यांना अर्ज करून आणि पोर्टलवर नाव येऊन देखील लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना या हेल्पलाईनवर संपर्क करून आपली समस्या मांडता येणार आहे. पीएम किसान योजनेसंदर्भातील कोणत्याही अडचणी किंवा तक्रारींसाठी शेतकरी ०१२०-६०२५१०९ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात. तसेच योजनेविषयीची कोणतीही माहिती मेलव्दारेही मागवू शकतात. यासाठी शेतकऱ्याला pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा लागेल.  

Team Lokshahi News