Categories: कृषी

PM Kisan : सरकार आणखी ४ कोटी शेतकऱ्यांना देणार लाभ; ताबडतोब ‘या’ ठिकाणी करा नोंदणी

नवी दिल्ली |  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांची संख्या आता चार कोटीवर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेसाठी २० ऑगस्टपर्यंत १० कोटी ४४ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच यातील काही शेतकऱ्यांना एका हप्त्याचा लाभही देण्यात आला आहे. 

या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, देशात १४.५ कोटी शेतकरी कुटूंबे आहेत. परंतु अद्यापही या योजनेपासून तब्बल ४ कोटी शेतकरी वंचित असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत जे लोक यापासून वंचित आहेत, त्यांनीही नोंदणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून त्यांना शेतीसाठी वार्षिक ६ हजार रुपयांची मदत मिळू शकेल असे सरकारचे म्हणणे आहे. नवीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे पुरेशी कागदपत्र उपलब्ध असली पाहिजेत. म्हणूनच कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की, पीएम किसान योजनेचा लाभ घरातील बऱ्याच लोकांना मिळू शकतो, मात्र ते अल्पवयीन नसावेत आणि त्यांचे नाव महसूल रेकॉर्डमध्ये नोंदले गेलेले असावे. जर एखाद्याचे नाव शेतीच्या कागदपत्रांमध्ये असेल, तर त्या आधारावर ते वेगळा लाभ घेऊ शकतात.

आता शेतकऱ्यांना स्वतःच या योजनेसाठी नाव नोंदवता येणार – 
आता या योजनेत कृषी अधिकारी कार्यालय व लेखापाल यांना भेट देण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडे जावे लागणार नाही. कोणीही पीएम किसान या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘किसान पोर्टल’ या ठिकाणी स्वत:ची नोंदणी करू शकतो. सर्व शेतकर्‍यांना योजनेशी जोडणे आणि नोंदणीकृत लोकांना वेळेवर लाभ देणे हा या मागचा हेतू आहे. कृषी मंत्रालयाची ही सुविधा सुरू झाल्यानंतर राज्य सरकारना शेतकऱ्यांच्या तपशिलातील चुका सुधारण्यास आणि पडताळणी करण्यास बराच वेळ लागत आहे. त्यामुळेच अद्याप देशातील तब्बल ४ कोटी शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे सांगितले जात आहे.

पीएम किसान योजनेसंदर्भातील महत्वाच्या लिंक –
लाभार्थ्यांच्या खात्याचा तपशील
लाभार्थी यादी
नवीन नाव नोंदणी
आधार अपडेट

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी ‘ही’ सुविधा – 
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डही (केसीसी) देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पीएम-किसान योजनेला केसीसीशी लिंक केले गेले आहे. याद्वारे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ ४ टक्के दराने उपलब्ध होईल. पीएम-किसान लाभार्थ्यांविषयी अधिक माहिती बँकांकडे आधीच असल्याने बँकांना शेतकऱ्यांना केसीसी देण्यात अडचण येणार नाही.

  • यांना लोकांना पीएम किसानचा लाभ नाही –
    • जे शेतकरी भूतपूर्व किंवा विद्यमान घटनास्थ पदाधिकारी आहेत, विद्यमान किंवा माजी मंत्री, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आहेत, ते जरी शेती करत असतील तरीही त्यांना या योजनेत विचारात घेतले जाणार नाही.
    • केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये अधिकारी आणि १० हजाराहून अधिक पेन्शन मिळवणार्‍या शेतकर्‍यांना फायदा मिळणार नाही. बाकीचे पात्र असतील.
    • व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील, आर्किटेक्ट, जो कोणी शेतीही करत असेल, त्यांना लाभ मिळणार नाही. गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरलेले शेतकरी या लाभापासून वंचित राहतील.
    • केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ/ चतुर्थ श्रेणी/ गट डी कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना