नवी दिल्ली | दिवसेंदिवस पीएम किसान योजनेतील अटींचा अधिकाधिक वापर करून सरकारच्या वतीने केवळ पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे दिसते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नव्याने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत असून देखील देशभरातील शेतकऱ्यांचा एकूण आकडा मात्र फारसा वाढताना दिसत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे जे शेतकरी पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांना वगळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या लाभ घेण्यासाठी ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. जर शेत जमीन आजोबांच्या किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्ज करणारी व्यक्ती कुठेही सरकारी नोकरी करीत असेल किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबरोबरच जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तेही या योजनेस पात्र नसतील. नवीन रजिस्टरेशनसाठी येथे क्लिक करा.
पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या नियमानुसार, जर आपली शेतजमीन आणि ती शेती करण्यायोग्य आहे, पण आपण त्याचा उपयोग दुसऱ्याच गोष्टींसाठी करत असाल तरीही आपण या योजनेसाठी पात्र नाही. जर आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर, आपण करदाते असाल तर या योजनेसाठी आपण अपात्र ठरू शकता. एकूणच पीम किसान योजनेसाठी दिवसेंदिवस अटी शर्थींची कडक अंमलबजावणी करत मर्यादित स्वरूपातच शेतकऱ्यांना लाभ देण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे दिसत आहे. या योजनेचा सहावा हप्ता साडे आठ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.