Categories: कृषी

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना 17,793 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली। लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांसाठी आणि शेतीकामासाठी भारत सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग अनेक उपाययोजना करीत आहे. लॉकडाऊनच्या 24 मार्च 2020 पासून आजपर्यंतच्या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत सुमारे 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला आहे. सरकारने यासाठी आत्तापर्यंत 17,793 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. सध्याच्या परिस्थितीत अन्न सुरक्षा देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएम-जीकेवाय) पात्र कुटुंबांना डाळींचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सुमारे 107,077.85 मेट्रिक टन डाळ वाटपासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंदमान आणि निकोबार, आंध्रप्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दमण आणि दीव, गोवा, गुजरात या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लाभार्थ्यांना डाळींचे वितरण सुरू केले आहे. मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि दिल्लीसारख्या इतर राज्यांना आंशिक साठा मिळाला आहे आणि त्यांच्या नियोजनानुसार लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वितरण केले जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळींच्या वितरणामुळे 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील  सुमारे 19.50 कोटी घरांना लाभ मिळणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर