Categories: Featured कृषी

अन्यथा… पीएम किसान योजनेतून पैसे मिळणे होईल बंद, वेळीच करा ‘हे’ काम!

लोकशाही.न्यूज। पीएम किसान निधी अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. काही शेतकऱ्यांना २ हप्ते मिळाले आहेत, तर काही शेतकऱ्यांना १ हप्ता मिळाला आहे. याबरोबरच काही शेतकरी अद्यापही या योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या नोंदणीचे काम सध्या सुरू असून शेतकऱ्यांनाही स्वतःची नोंदणी स्वतः करून या योजनेत सहभाग घेता येत आहे.

काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सध्या मिळत असला तरी भविष्यात काही तांत्रिक दोष आढळल्यास शेतकऱ्यांना मिळणारा लाभ बंद होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने ‘पीएम किसान’ पोर्टलवरील नाव आणि आधार कार्डावरील नाव यात जर तफावत आढळली तर शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवरील आपले नाव आणि आधारकार्डवरील नाव यांची खात्री करून घेणे गरजेचे आहे. यात तफावत असल्यास ती वेळीच दुरूस्त करणेही गरजेचे आहे. हे काम तलाठी ऑफिस, सेवा केंद्र अथवा स्वतःच्या मोबाईलवरून स्वतःच करता येणार आहे.

  • नाव बरोबर आहे की नाही तपासण्यासाठी व दुरुस्ती साठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी .
  • http://www.pmkisan.gov.in
  • Farmers Corner
  • Edit Adhar Failure Record
  • Enter Adhar Number and Captcha code
  • Search
  • Enter Name as per Adhar card
  • Update
  • Record Updated Successfully .

अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल, अथवा कंप्यूटर वर किंवा CSC सेंटर वर जाऊन नावात दुरुस्ती करू शकता. जेणे करून भविष्यात निर्माण होणारे नुकसान टाळता येईल. हे ही वाचा-  पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत स्वतःच सहभागी व्हा आणि मिळवा ६ हजार रूपये

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank insurance crop insurance crop loan farm insurance ICICIINSurance insurance against live stock PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA Pm kisan सन्मान निधी योजना SBI Insurance किसान सम्मान निधि योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना पंतप्रधान शेतकरी योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान लिस्ट पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम-किसान योजना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना 2019 शेतकरी सन्मान निधी योजना यादी शेतकरी सन्मान योजना शेतकरी सन्मान योजना 6000