Categories: Featured कृषी

… अन्यथा ‘PM किसान’चे पैसे तुमच्या खात्यातून सरकार परत घेणार आणि करणार कठोर कारवाई!

नवी दिल्ली। देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी किसान सम्मान निधी योजना (PM Kisan) ची सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने या योजनेत देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तर आतापर्यंत ९ कोटी शेतकऱ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी जमा करत आहे. ही राशी शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने ३ हफ्त्यात मिळत आहे. सरकारने ठरविलेल्या नियमांनुसार योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. तर काही महाशय नियमात न बसता खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता अशा नियमबाह्य पैसे लाटणाऱ्या  शेतकऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार आहे.

बँक खात्यातील पैसे परत घेतल्यानंतर होणार शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, जर कोणी चुकीची किंवा खोटी माहिती देऊन या योजनेचा फायदा घेत असेल. आणि नंतर पकडला गेला तर त्यांच्या खात्यात ट्रांसफर करण्यात आलेले पैसे परत घेतले जातील. त्यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या योजनेसाठी अपात्र शेतकरी

  • शेत जमीन दुसऱ्या कामासाठी वापरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • संवैधानिक पदावर असल्यास, म्हणजे भूतकाळात किंवा वर्तमान काळात संवैधानिक पदावर कार्यरत असल्यास ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये अधिकारी असल्यास किंवा १० हजार रुपयांपेक्षा अधिकची पेन्शन घेणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत .
  • डॉक्टर, इंजिनिअर, सीएम, वकील यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात ते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत.

कसा करणार योजनेसाठी अर्ज – 

योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून स्वतःच आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम – योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

पीएम – किसान (PM Kisan Scheme) योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र

आपली नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Farmers Corner वर आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाची माहिती वेळोवेळी घेतली पाहिजे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर