pm-kisan-samman-nidhi
आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्याप आपणास एकही हप्ता (आर्थिक मदत) मिळालेला नसेल तर तो आपणास मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी आता सरकारने चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकर्यांसाठी एक महत्वाची सरकारी योजना असून या योजनेंतर्गत सरकार प्रत्येक शेतकऱ्याला तीन समान हप्त्यात वर्षाकाठी ६००० रूपये देत आहे. आतापर्यंत नऊ कोटीहून अधिक शेतकर्यांना या सरकारी योजनेचा लाभ मिळाला आहे.
ज्यांना लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता पैसे मिळणार की नाही हे एका फोन कॉलवर जाणून घेता येणार आहे. त्यासाठी सरकारने (011) 24300606 हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांचा रजिस्टर्ड नंबर वरून या नंबरवर कॉल करता येणार आहे.
वास्तविक, पीएम किसान योजनेसाठी पात्र असूनही, जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही अडचण उद्भवलेल्या असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्डमधील तुमचे नाव बँक खात्यापेक्षा वेगळे असू शकते. आयएफएससी कोड किंवा खातेनंबरात झालेली चूक, नागरी बॅंक किंवा एखाद्या ग्रामीण बॅंकेत असेलेले खाते; जे डीबीटी साठी पात्र ठरत नाही, त्यामुळे या चूका दुरूस्त करून खाली दिलेल्या सूचनानुसार अनुसरण करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
टीप – आपले नाव केवळ चुकीचे असल्यास आपण ते ऑनलाइन सुधारू शकता. इतर कोणतीही चूक असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा.
पंतप्रधान–किसान महत्वाचे दुवे
– आधार तपशील येथे संपादित करा
– लाभर्थ्यांची स्थिती तपासा
– पंतप्रधान-किसान यादी तपासा