Categories: कृषी बातम्या

PM किसान योजना फक्त वर्षाला ६ हजार रूपयेच देत नाही; तर ‘हे’ आहेत अतिरिक्त लाभ!

नवी दिल्ली। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान-किसान या नावाने देशभर प्रसिद्ध आहे. मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेली ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. देशातील ११ कोटीहून अधिक शेतकरी सध्या या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान निधी योजनेमधून प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्यास दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. या आर्थिक सहाय्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आणखी तीन फायदे दिले जातात, ज्याची अनेक शेतकऱ्यांना माहितीच नसते. 

पंतप्रधान-किसान योजनेचे ‘हे’ आहेत अतिरिक्त लाभ

१. केसीसी-किसान क्रेडिट कार्ड – देशातील शेतकऱ्यांना सहजरित्या कोणत्याही तारणाशिवाय १ लाख ६० हजार रूपयांपर्यंतचा कर्जपुरवठा व्हावा यासाठी किसान क्रेडीट कार्ड ही योजना राबवली जाते. पीएम किसान योजनेत समाविष्ठ असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक कर्ज मिळण्यास मदत होत आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना केवळ एक फॉर्म भरून किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेता येतो. कारण PM किसान योजनेसाठी शेतकऱ्यांची आवश्यक सर्व कागदपत्रे यापूर्वीच सरकारकडे जमा असल्याने पुन्हा वेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. त्यामुळे किसान क्रेडीट कार्ड एका क्लिकवर फॉर्म भरल्यास मिळते. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के व्याजाने ३ लाख रूपयापर्यंत कर्ज दिले जाते. (निळ्या रंगातील अक्षरांवर क्लिक करून आपण थेट त्या वेबसाईटला जाऊन पाहू शकता, अर्ज करू शकता.)

२. पीएम किसान मानधन योजना – जे शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. पीएम किसान सन्मान निधीसाठी या शेतकर्‍यांचे संपूर्ण कागदपत्र आधीच भारत सरकारकडे जमा आहे. पंतप्रधान किसान मानधन ही देशातील शेतकर्‍यांसाठी निवृत्तीवेतन देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभातील थेट हिस्सा मानधन योजनेसाठी देऊन उतारवयात निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकतात. 

३. किसान कार्ड बनवण्याची योजना – मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आकडेवारीच्या आधारे देशातील शेतकऱ्यांसाठी अनोखा शेतकरी ओळख (आयडी) तयार करण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान किसान आणि राज्यांमार्फत केलेल्या भूमी अभिलेख डेटाबेसला जोडून हे ओळखपत्र बनवले जाणार आहे. हे कार्ड तयार झाल्यावर देशभरातील शेतकर्‍यांना शेती संबंधित योजना सहजरित्या देणे अगदी सोपे होईल.

वेगवान सत्यापन प्रक्रिया – पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी जिल्हास्तरावर पडताळणीची प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे अपात्र असून देखील लाभ उकळत आहेत अशांनाही आळा घातला जात आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 आत्मनिर्भर भारत योजना एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना मोदी सरकार योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर