Categories: कृषी

PM किसान योजनेतून ६००० ऐवजी आता वर्षाला मिळतील ११,००० रूपये? वाचा पूर्ण बातमी!

नवी दिल्ली | देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ५००० रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत ११ कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. त्यांना दरवर्षी ६००० रूपये दिले जातात. सरकारने ही शिफारस मान्य केली तर सरकार दरवर्षी खत अनुदानासह शेतकऱ्यांना ११,००० रुपये देईल.

शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी ५००० हजार रुपये रोख द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) वर्षातून दोनदा हस्तांतरित करता येईल, अशी शिफारसही आयोगाने केली आहे. खरीप आणि रब्बी हंगामनिहाय प्रत्येकी २५०० रुपये असे दोन्ही हंगामाचे मिळून ५००० रूपये द्यावेत असे आयोगाचे म्हणणे आहे.

दरम्यान, कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) वर केंद्र सरकारला सल्ला देण्याच्या आयोगाच्या शिफारसींचा विचार केला गेला तर पंतप्रधान सन्मान निधीच्या वार्षिक ६००० रुपयांच्या व्यतिरिक्त, ५००० रुपयांचे खत अनुदानही डीबीटी व्दारे जमा होईल. जर सरकारने खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले, तर खताच्या स्वस्त विक्रीसाठी कंपन्यांना देण्यात येत असलेले अनुदान द्यावे लागणार नाही.

खत कंपन्यांना केद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना सध्या बाजारात युरिया आणि डीएपी सारखी खते स्वस्त दरात मिळतात. यामध्ये सरकार सवलतीच्या किंमतीसह वास्तविक किंमत आणि अनुदानित किंमतीच्या फरकाइतकी रक्कम कंपन्यांना देत असते. 

  • असा करा PM Kisan योजनेसाठी अर्ज
    • PM किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ अर्थात www.pmkisan.gov.in/ वर जावे. याठिकाणी होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल. यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅप्चा कोड यादी गोष्टी भरून आपली नोंदणी करू शकतात. किंवा स्वतः भरलेल्या खात्याचा तपशिल जाणून घेऊ शकतात.
    • आपले नाव सुचीमध्ये आहे का नाही हे पाहण्याठी लाभार्थी यादी म्हणजेच Beneficiary list वर क्लिक करावे.  यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव भरुन तपासू शकता.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 24000 rupees pm kisan 6000 RUPEES PM KISAN SAMMAN YOJANA agriculture bills buy insurance CACP Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA Minimum support price MSP online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना