Categories: Featured

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीकविम्याचे २४२४ कोटी वितरित, अशी पहा यादी

नवी दिल्ली। केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देत पीक विम्याचे २४२४ कोटी रूपये वितरित केले आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबत माहिती दिली असून याबरोबरच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक उपाययोजना केल्याचे मंत्रालयाने म्हणटले आहे. 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १२ राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना २४२४ कोटी रूपये विमा वितरित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पीएम किसान निधी योजनेतील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अथवा के.सी.सी चाही लाभ मिळणार आहे. सध्या देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्रसरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 

  • शेतकरी बंधूनी पीकविम्यासंदर्भात आपले स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा. यादी पाहण्यासाठी पिकविमा भरलेली पावती सोबत ठेवा. त्याचा क्रमांक टाकून आपले स्टेटस् पाहू शकता.

किसान क्रेडीट कार्डच्या संदर्भात आतापर्यंत ८३ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १८.२६ लाख अर्जांना १७८०० कोटीचे कर्ज मंजूर करण्याच आले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: pik vima 2018-19 list pik vima 2020 pik vima yadi 2019 pmfby 2020 pmfby kharif 2019 maharashtra list pmfby kharif list pradhan mantri fasal bima yojana 2019 pradhanmantri pik vima yojana पिक विमा 2019 पिक विमा 2019 20 पिक विमा खरीप पीक विमा यादी 2020 पीक विमा योजना पीक विमा योजना माहिती प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री पीकविमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना 2019 20