Categories: Featured

कोरेगाव भिमा येथे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी घेतलेत ‘हे’ मोठे निर्णय

पुणे।२७ डिसेंबर।कोरेगाव भिमा येथे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.येथे १ जानेवारीला विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा करण्यात येतो. त्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दाखल होतात. त्यामुळे येथील परिसरात शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ३५० सीसीटीव्ही आणि १० ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आलाय. पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी याबाबत माहिती दिलीय.

कोरेगाव भिमा येथे दोन वर्षापूर्वी विजयस्तंभ परिसरात दंगल घडल्याने महाराष्ट्रासह देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यावेळी समाजकंटकांकडून मोठ्या हिंसक घटना घडल्या होत्या. त्यामुळे या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून शासकिय पातळीवर सर्व यंत्रणा कोरेगाव भिमा, पेरणेफाटा येथे थांग मांडून बसल्या आहेत.

शासकीय यंत्रणेतून या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराचा आधार घेण्यात येत आहे. याच परिसरात सर्व कॅमेरांचे चित्रिकरण कंट्रोल रुमला जोडले असून त्या ठिकाणावरुन नजर ठेवली जाणार आहे.

दरम्यान, दोन वर्षापूर्वी कोरेगाव भिमा येथे दंगल झाली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच सोशल मीडियावरही पोलिसांची नजर आहे. जर कुणी आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट टाकली तर त्याच्यावरही तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: babasaheb aambedkar Bhima Koregaon riots cctv Koregaon Koregaon Bhima Koregaon Bhima security arrangements police security pune