Categories: गुन्हे

कोल्हापूर : पोलिस उपनिरिक्षकासह कॉंस्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ

कोल्हापूर | राजारामपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरिक्षकासह एक पोलिस कॉंस्टेबल आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. १ लाखाची मागणी करत ४० हजार रूपये स्विकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच एका पंटरलाही अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मटका जुगाराच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करणार नाही, असे सांगून एका युवकाकडून ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, ४० हजारांची लाच स्विकारताना राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह, कॉन्स्टेबल आणि पंटरला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले आहे. यामुळे कोल्हापूर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिस दलातील काळा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. ही कारवाई शनिवारी (१९ स्पटेंबर) दुपारी करण्यात आली असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, कॉन्स्टेबल रोहित पवार (बक्कल नंबर १६४१) आणि पंटर रोहित रामचंद्र सोरप (रा. उजळाईवाडी, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक गुरव यांची राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या प्रमुखपदी गेल्या काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी निवड केली होती. 

सदरची कारवाई पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरिक्षक जितेंद्र पाटील, पोहेकॉ. शरद पोरे, अजय चव्हाण, पो.कॉ. विकास माने, मयुर देसाई, संग्राम पाटील, रूपेश माने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली.

Team Lokshahi News