Last Date : Post Office Job – १० वी, १२ वी पास, महिना पगार ८१ हजारपर्यंत

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी पोस्ट ऑफिसमधील नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट (India Post) अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये ही भरती होणार आहे. विशेष म्हणजे 10 वी आणि 12 वी पास उमेदवारही या नोकरीसाठी पात्र आहेत.

भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी ही घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी पोस्टमन/मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आज 27 नोव्हेंबर 2021 ही अंतिम तारीख आहे.

  • पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ
  • पद संख्या – 257 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/12th Pass (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क – रु. 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021
Maharashtra Postal Circle Bharti 2021

पात्रता –
पोस्टमन/मेल गार्डसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डमधून 12 वी पास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निवडीसाठी अर्जदाराने किमान दहावीपर्यंत मराठी भाषा शिकलेली आणि उत्तीर्ण केलेली असावी. तर गोवा राज्यात अर्जदार किमान 10 वी पर्यंत कोंकणी किंवा मराठी भाषा शिकलेला आणि पास झालेला असावा. त्याशिवाय कंप्यूटरवरही काम येणं गरजेचं आहे. अर्जदाराची कंप्यूटरवर डेटा एंट्री स्किल टेस्ट केली जाईल.
मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून 10वी पास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निवडीसाठी अर्जदार किमान 10वीपर्यंत मराठी भाषा शिकलेला आणि त्यात पास झालेला असावा. तर गोव्यात निवडीसाठी अर्जदार कमीत-कमी 10 पर्यंत मराठी किंवा कोंकणी भाषा शिकलेला आणि पास झालेला असावा. मल्टी टास्किंग स्टाफसाठीही कंप्यूटरवर डेटा एंट्री स्किल टेस्ट घेण्यात येईल.

या लिंकवर नोकरीसाठीची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिसमधील या नोकरीसाठी किमान बेसिक पगार 18000 ते 81100 रूपये इतका दिला जाणार आहे. तरी विहित नमुन्यात अर्ज करून उमेदवारांनी या संधीचा फायदा घेणे गरजेचे आहे.