मुंबई | कमी वेळेत पैसा कमवण्याचे मार्ग अनेकजण शोधत असतात. त्यासाठी अनेकांकडून शेअर बाजारात गुंतवुकीचे प्रयत्न केले जातात. असे असले तरी शेअर बाजारातील जोखीम मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी जर तुम्ही जोखीम न घेता गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची अशी योजना सांगणार आहोत, जी (Post Office Schemes) सर्वात लोकप्रिय आहे, कारण यामध्ये उत्तम रिटर्न मिळण्यासोबतच तुमचे पैसेही सुरक्षित राहतात. तुम्ही या योजनेत अगदी कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. पैसे दुप्पट करण्यासाठी लोक या योजनेचा खूप वापर करतात. तसेच या योजनेत कोणतीही जोखीम नाही. ही योजना म्हणजेच किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजना होय.

पैसा दुप्पट होण्याचा कालावधी

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांना 6.9 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. यामध्ये जास्तीत जास्त किती गुंतवणुक करावी याला मर्यादा नाही. तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरु केल्यानंतर एक वर्षाच्या आत योजना बंद केल्यास तुम्हाला कोणताही व्याजाचा लाभ मिळत नाही. किसान विकास पत्रातील तुमची गुंतवणूक 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होते.