india post
नवी दिल्ली |आपल्या देशातील टपाल सेवा ही जगातील सर्वात मोठी टपाल सेवा आहे. आजही देशाच्या अनेक भागात टपाल सेवेची कमी आहे. हे कमी भरुन काढण्यासाठी पोस्टल विभाग प्रयत्नशील असून पोस्ट ऑफिसची फ्रॅंचाइजी उपलब्ध करून दिली जात आहे. जर आपण आपला व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर ही संधी तुम्ही नक्कीच भविष्यात चांगल्या कमाईचे साधन ठरणार आहे. पोस्ट ऑफिसच्या फ्रॅंचाइजीचे दोन प्रकार असून पहिली आऊटलेट फ्रॅंचाइजी आणि दुसरी पोस्टल एजंट फ्रॅंचाईजी आहे. यासाठी अर्ज करणाऱ्याचे वय हे १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे.
फ्रॅंचाइचीसाठी किती येतो खर्च – फ्रॅंचाइझीसाठी आपल्याला ५ हजार रुपयांचा खर्च येतो. सिक्युरिटी डिपॉझिटच्या रुपाने ही रक्कम आपल्याकडून घेतली जाते. यानंतर आपल्याला आपल्या परिसराचा स्टॅम्प, स्टेशनरी, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर यासारख्या सेवा उपलब्ध कराव्या लागतील. आपल्या कामानुसार, आणि पोस्ट विभागाने निश्चित केल्याप्रमाणे कमीशन मिळेल. म्हणजेच आऊटलेट सुरू केल्यानंतर फ्रॅंचाइजी मालकाला कमीशन रुपात ही कमाई होईल.
असा करा अर्ज https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Framchise.pdf या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज डाऊनलोड करू शकता. अर्जातील माहिती भरल्यानंतर, तो अर्ज पोस्ट विभागात जमा करावा. जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर टपाल विभाग आणि आपल्या मध्ये एक एमओयू करावा लागेल. त्यावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर आपल्याला फ्रॅंचाइजी सुरू करून काम चालू करता येईल.