नवी दिल्ली। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्रालयाने पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत १६.०१ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात ३६,६५९ कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) च्या माध्यमातून जमा केले आहेत. या योजनेची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी केली आहे. तर याची घोषणा १५ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जनधन खातेधारकांना हा मोठा दिलासा दिल्याचे बोलले जात आहे. १७ मार्च ते १७ एप्रिलच्या कालावधीत ३६,६५९ कोटी रुपयांची ही रक्कम वितरित करण्यात आली आहे. याबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या रोख रकमेचेही DBT मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत, जनधन खात्यातील महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात येत आहे. १३एप्रिल २०२० पर्यंत अशा महिला लाभार्थ्यांची संख्या १९.८६ कोटी होती, त्यांच्या खात्यात एकूण ९९३० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गतही महिलांच्या खात्यात गॅसची सबसिडी जमा करण्यात आली आहे.
तुमचा जन धन योजना खात्याची शिल्लक कशी तपासायची?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) भारतातील बँकिंग ग्राहकांसाठी *99# सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेचा उपयोग ज्यांच्याकडे कोणत्याही बँकेत बँक खाते आहे अशा कोणालाही मोबाइल बँकिंगसाठी करता येईल. परंतु यासाठी तुमच्याकडे मोबाइल फोन, स्मार्ट फोन किंवा अगदी मूलभूत फोन असणे आवश्यक आहे. तसेच, मोबाइल फोन हा जीएसएम सक्षम असणे आवश्यक आहे. तथापि, सीडीएमए हँडसेटचे वापरकर्ते ही सुविधा वापरू शकत नाहीत