मुंबई | विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भुदरगड- राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर देखील ‘नॉटरिचेबल’ झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर हे गुजरात मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी त्यांनी आपण शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितल्याचे समजत आहे. त्यांनी आपले बंधू अर्जून आबिटकर यांना मातोश्रीवर यासंदर्भात निरोप देण्यासाठी पाठवल्याचे समजत आहे. याबाबतची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.