Categories: कृषी

पंतप्रधान मोदी आज ११.३४ कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार; यादीत तुमचेही नाव आहे का पहा एका क्लिकवर…

Prime Minister Modi will deposit money in the accounts of 11.34 crore people today

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वतः एका जाहीर कार्यक्रमात देशातील ११.३४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. स्वर्गिय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोदी देशातील सर्वसामान्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणार आहेत. हे पैसे अर्थातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्याना दिले जाणार आहेत. आज (२५ डिसेंबर) सकाळी १२ वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरवात होईल. 

तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी खात्यात पैसे येण्यापूर्वी पैसे येण्याच्या लिस्टमध्ये आपले नाव आहे का? याची एकदा खात्री करणे गरजेचे आहे. त्यासाठी 👉 PM Kisan Installment list 👈  या लिंकवरून आपले नाव यादीत असल्याची खात्री करू शकता. कारण आज (शुक्रवार २५ डिसेंबर २०२०) पीएम किसान योजनेतील पैसे खात्यात येणार असले तरी काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे पैसे मिळणार नसल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने नाव, खाते नंबर, आधार नंबर, यासारख्या बाबींमधील किरकोळ चुका, तांत्रिक दोष कारणीभूत आहेत. तसेच जे शेतकरी इन्कम टॅक्सधारक आहेत, इतर व्यवसायात आहेत अशा शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.

आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील यंदाच्या आर्थिक वर्षातला हा तिसरा हप्ता आहे. मोदी सरकार वर्षातून ३ वेळा प्रति हप्ता २००० प्रमाणे शेतकऱ्यांना शेती बि-बियाणे, औषधे, खते यासारख्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी हे पैसे देत आहे. ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून शेतकरी वर्गाकडून हप्त्याचे पैसे कधी मिळणार याबाबत नेहमी उत्सुकता असल्याचे पहायला मिळते. बहुतांशी वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एखाद्या कार्यक्रमाचे निमित्त साधून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना