पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेतून किती जणांना दरमहा ३५०० रूपये मिळाले पहा..

नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मिडीयावर ‘पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना’ अंतर्गत दरमहिना ३,५०० रुपये मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी काही लिंक देखील दिल्या जात आहेत. अनेकजण या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे अशा कितीजणांना याचा लाभ मिळलाय हे देखील पाहणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेचा नेमका कितीजणांना फायदा झालाय..

व्हायरल होणाऱ्या पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेची शहानिशा केली असता नेमकं काय सत्य समोर आलयं पहा….
‘पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजना’ नावाने अशी कोणतीही योजना केंद्र सरकारच्या वतीने चालवली जात नसून केवळ फसवणुकीच्या हेतूने अशा लिंक सोशल मिडीयावर व्हायरल केल्या जात आहेत. याबद्दल केंद्र सरकारच्या PIB या विभागाकडून देखील याबाबत खुलासा करण्यात आला असून ही फसवी योजना असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुणालाही झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • सरकारी योजना शक्यतो .gov.in या डोमेन वर पहायला मिळतात. त्यामुळे लिंकमधील डोमेनची खात्री करूनच अशा लिंक क्लिक कराव्यात. अन्यथा लालसेपोटी कदाचित तुमचेच बँक खाते रिकामे होईल.
  • पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना नावाने व्हायरल होणाऱ्या संदेशात असे लिहिले आहे की या योजनेंतर्गत आपली नोंदणी करा. योजनेंतर्गत बेरोजगारांना दरमहा ३५०० रुपये देण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी अर्ज विनामूल्य असल्याचे सांगितले जाते, दहावी उत्तीर्ण आणि वय १८ ते ४० पर्यंत विहित केलेले आहे. यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ही देण्यात येत आहे. नोंदणीसाठी  http://bit.ly/pradhanmantri-berozgaari-bhattaa-yojna किंवा http://bit.ly/pradhanmantrl-berojgar-bhatta-yojnaa या दुव्यावर क्लिक करण्यास सांगितले जात आहे.

फसवणुक करणाऱ्यांना हे माहित आहे, की अनेक लोक हव्यासापोटी खातरजमा न करताच एकामागोमाग एक लिंकवर क्लिक करतात, आणि हजारो लोकांना अशा प्रकारच्या लिंकही फॉरवर्ड करतात. या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईल मधील महत्वाचा डाटा चोरी केला जातो. अथवा ईमेलसारख्या माध्यमातून तुमची महत्वाची माहिती चोरी होते. यामध्ये तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, सोशल खात्यांचे पासवर्ड, मोबाइल फोनमध्ये असलेली महत्वाची माहिती, संकेतशब्द हे सर्व चोरी केले जातात. याचा वापर करून तुमच्या नावाने बोगस कर्जदेखील उचलले जाऊ शकते. अशी अनेक प्रकरणे उघडकीस देखील आलेली आहेत. 

https://amzn.to/30iel3L
  • या लिंकवर क्लिक केल्यास Earnwithkp तसेच https://smartklick.biz/ हा ब्लॉग ओपन होत आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यास ब्लॉगकर्त्याला Googel Adsense च्या माध्यमातूनही लाखो रूपयांची कमाई होते. त्यामुळे अशा फसव्या लिंक वर क्लिक करून स्वतःबरोबर लोकांचाही वेळ खर्च करणे चुकीचे आहे.