Categories: राजकीय

आनंदराव पाटील गट भाजपात गेल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयाचा मार्ग सुखकर

सातारा।२५ सप्टेंबर। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सहकारी आणि काँग्रेसचे राज्यपाल नियुक्त आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे व चिरंजीवांनी नुकताच विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. आनंदराव पाटील यांनी अजूनही भाजपा प्रवेश केला नसला तरीही त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या आजवरच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. 

आनंदराव पाटील गट भाजपात जाणे म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला मोठा धक्का अशी हेडलाईनखाली स्थानिक तसेच राज्यपातळीवरील मिडीयामधून दाखवली जात आहे, पण वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे. पाटील गट भाजपात जाण्याने तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांतून ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को’ अशी प्रतिक्रिया उमटत आहे. वर्षानुवर्षे सातारा जिल्हाध्यक्ष पदावर मांड राखून असलेले आनंदराव पाटील राजकीय भविष्यासाठी भाजपामध्ये जात नसून त्यांच्यावरील आयकर व ईडीची कारवाई होवू नये म्हणून जात असल्याचे आनंदराव पाटील यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

एकीकडे वीस वर्षे जिल्हाध्यक्ष पद सांभाळणारे आनंदराव कृष्णा खोरे महामंडळावर काही काळ उपाध्यक्ष होते. राष्ट्रकुल सदस्य मंडळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पृथ्वीराज चव्हाण यांचा डावा हात अशी ख्याती असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदाराने ऐन विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस सोडणे म्हणजे अतुल भोसलेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे भाजपा आणि अतुल भोसले समर्थक सांगत असले तरीही प्रत्यक्षात आनंदराव पाटील भोसले गटात सामील होण्याने भोसले गटाची ताकद वाढण्याऐवजी कमी होणार आहे. पाटील यांचे पक्षांतर्गत उपद्रवमुल्य संपूर्ण तालुक्याला माहीत आहे.

तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचे ‘मंथरा कारस्थान’ आनंदराव पाटील यांनीच केले होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कार्यपध्दतीवर नाराज होवून दुरावलेले काँग्रेसचे हक्काचे निष्ठावान कार्यकर्ते परत एकदा पूर्ण ताकदीने सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरेंनी काँग्रेस सोडावी म्हणून रामराजेंना हाताशी धरुन सातत्याने आनंदरावनी गोरेंविरुद्ध कटकरस्थाने केली होती. ज्याचे फलित जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचा एक खासदार माढयातून पाडला आणि काँग्रेसच्या निंबाळकरांना भाजपमधून खासदार केले. त्यासोबतच आनंदराव पाटील यांच्या उपद्रवाने जयकुमार गोरेसुद्धा काँग्रेसला गमवावे लागले. भाजपला आनंदराव पाटील यांच्यापेक्षा गोरेंची जास्त गरज असल्याने गोरेंच्या भूमिकेवरच आनंदराव पाटील यांची भाजपमधील पुढील वाटचाल ठरणार आहे.

कराड दक्षिणमधील मदनराव मोहीते यांच्या काँग्रेस सोडण्यामागेही आनंदराव पाटील यांचाच हात होता. मा.नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी काँग्रेसपासून फारकत घेण्याचे कारणही आनंदरावच होते असे बोलले जात आहे. तर कृष्णा खोरे उपाध्यक्ष पदाचा कालवधी संपल्यानंतरही ते उपाध्यक्ष म्हणून मिरवत होते. यानंतर सुशांत मोरे या आरटीआय कार्यकर्त्याने खुलास केल्यानंतर आनंदराव यांच्या काळात महामंडळातील गैरव्यवहारांचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवाल गायब झालाचे प्रकरण परत बाहेर काढायचे नसेल तर भाजपाप्रवेश करा, असा दम कराड भाजपच्या एका नेत्याने दिल्यानेच आनंदरावनी हा निर्णय घेतल्याचे आनंदराव समर्थकांचे म्हणणे आहे.

काँग्रेसमध्ये आनंदराव यांच्याविरोधातील चर्चा ऐकायला मिळत असतानाच, भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे अस्तित्व संपवणे म्हणजे त्यातील माणसं आपल्यापक्षात घेणं नव्हे तर त्या पक्षातील नेत्यांना पराभुत करुन घरी बसवलं तर तो पक्ष संपला असं म्हणता येईल पक्ष बदलला म्हणुन व्यक्तीची काम करण्याची पद्धत स्वभाव बदलत नाही कायमसत्तेत असणारी मंडळीच पुन्हा चिन्ह बदलुन सत्तेत येणार असतील तर जनतेला काय फक्त चिन्हांची अॅलर्जी आहे काय? अशा आशयाचे वॉटसअॅप मेसेज फिरतायेत. एकूण काय तर सध्या कराड दक्षिणेत काँग्रेससाठी आनंदी आनंद आहे.

 • © मेधा आगवेकर
Tags: Anandrao-Patil Prithviraj Chavan कराड दक्षिण
Team Lokshahi News

Recent Posts

 • बातम्या

१ डिसेंबरला शाळा सुरू होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास… Read More

November 29, 2021
 • नोकरी

ITI धारकांना सुवर्णसंधी; विद्युत विभागात 334 रिक्त पदांची भरती

पणजी | गोवा विद्युत विभाग येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.… Read More

November 29, 2021
 • नोकरी

उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे 12 वी/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

पणजी | उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार… Read More

November 28, 2021
 • नोकरी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे 138 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर… Read More

November 28, 2021
 • नोकरी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत… Read More

November 28, 2021
 • नोकरी

CDAC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 09 डिसेंबर पर्यंत ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मुंबई | प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज… Read More

November 28, 2021
 • नोकरी

ITI धारकांना नोकरीची सुवर्णसंधी – 2070+ पदांसाठी भरती

पुणे | आयटीआय धारकांना नोकरीची चांगली संधी मिळत असून पुणे येथे मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर /… Read More

November 28, 2021
 • नोकरी

10 वी/ ITI, पदवीधर उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

मुंबई | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर, फायरमन, इंजिन ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर पदांच्या एकूण 19… Read More

November 27, 2021
 • नोकरी

10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली | भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने… Read More

November 27, 2021
 • नोकरी

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत 413 रिक्त पदांची भरती

मुंबई | स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण 413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र… Read More

November 27, 2021