Categories: आरोग्य सामाजिक

पुणे : ‘अशी’ होती शरद पवारांची ‘सरप्राईज व्हिजिट’!

पुणे | पिंपरी-चिंचवड मधील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाच्या वैद्यकीय असुविधेबद्दल खंत व्यक्त केली आहे. जम्बो कोविड रुग्णालयात नेमके कसे उपचार केले जातात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. ‘पत्रकार असो वा सामान्य’ कोणाचाही बळी जायला नको, असे बजावत रुग्णालय प्रशासनाला चांगलेच झापले आहे.

दरम्यान पवार यांनी महापालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनासाठी स्वतंत्र जम्बो कोविड रुग्णालय निर्माण करुनही या ठिकाणी डॉक्टर्स, नर्स यांसोबत औषधे उपलब्ध नाहीत. अशा अनेक तक्रारी येत आहेत. सोबतच काही डॉक्टर गैरप्रकार करीत असल्याचे कानावर आले आहे. पण असं घडता कामा नये अशा तिखट शब्दात पवारांनी प्रशासनाची कानउघाडणी केली आहे.

Team Lokshahi News