Categories: आरोग्य बातम्या राजकीय सामाजिक

राहुल आवाडेंना पुन्हा कोरोनाची बाधा

कोल्हापूर | जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचा कोरोना चाचणी अहवाल दुसऱ्यांदा पॉजिटीव्ह आला आहे. दीड महिन्याचा कालावधीतच राहुल आवाडेंचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना होत नसल्याचा समज खोटा ठरला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना इकडे इचलकरंजी ही कोरोनाचे हॉटस्पॉट बनली होती. ऑगस्ट महिन्यात आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरातील १८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. यात माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे,  कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचाही समावेश होता. त्यावेळी योग्य उपचार घेऊन घरातील सर्व सदस्यांनी कोरोनावर मात केली होती. 

दरम्यान राहुल आवाडे यांना बुधवारी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. आज अहवाल पॉजिटीव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ते इचलकरंजीतील अलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

Team Lokshahi News