Categories: राजकीय

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहूल पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी..

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्र्रवादीचे जयवंतराव शिंपी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी सकाळी पालक मंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकिय विश्रामगृह येथे या नावांची घोषणा केली. 

जिल्हा परिषदेमध्ये दुपारी एक वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजप आघाडीचा निर्णय झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Team Lokshahi News