Categories: गुन्हे

माणगाववाडीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा, 2 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांची संयुक्त कारवाई – 2 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त; 9 गुन्हे दाखल

इचलकरंजी | प्रविण पवार | राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाने आज हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याचे 40 डबे मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तर 11हजार 350 लिटर कच्चे रसायन एकूण 2 लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

या कारवाईवेळी पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात शोध मोहिम राबवली असता आसपास 75 लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे यामध्ये रसायनाचा साठा केलेला आढळला. कारवाईत एकूण 9 गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिलीय.

सध्या जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यांतील विविध ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीच्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या हातभट्टी दारू अथवा बाजारात अवैध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या देशी, विदेशी तसेच बनावट अथवा परराज्यातील अवैध मद्य सेवन करू नये, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारे मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे मद्य प्राशन करण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येण्याची शक्यता असल्याने, अशा लोकांकडून कोरोना विषाणूचाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कारवाईत अधीक्षक व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर, निरीक्षक भरारी पथक, हातकणंगले, शाहुवाडी, कागल, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी व पोलीस विभागाकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस उपअधीक्षक जयसिंगपूर व हातकणंगले पोलीस  अशा 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

This post was last modified on June 13, 2020 10:23 PM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020